ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं. याच कारण म्हणजे कांद्यामध्ये असलेले सल्फर कंपाऊड, जे हवेत मिसळ्यावर डोळ्यांना त्रास होऊ लागतो.
डोळ्यांची आग किंवा डोळ्यातून पाणी न येण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सिंपल ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्स नक्की वापरुन पाहा.
कांदा चिरण्यापूर्वी कांद्याला ३०मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे डोळ्यांची आग होणार नाही.
कांदा चिरताना च्युइंग गम चघळा. यामुळे डोळ्यातून पाणी येणार नाही.
कांदा चिरण्यापूर्वी चाकूवर थोडा लिंबाचा रस लावा मग कांदा चिरा.
कांदा चिरताना बाजूला मेणबत्ती जळवून ठेवा. यामुळे डोळ्यांना होणारी आग कमी होते.
या सिंपल ट्रिक्सला वापरुन तुम्ही न रडता देखील कांदा चिरु शकता.