Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे नीतिशास्त्रात जीवन, समाज आणि व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या अनेक गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्यांनी काही अशा ठिकाणांचा उल्लेख केला आहे जिथे थांबल्यास व्यक्तीची प्रगती थांबू शकते.
चाणक्य नितीमध्ये चाणक्य म्हणतात, शिक्षेचा आदर नसलेल्या ठिकाणी राहणे म्हणजे अंधारात जीवन जगणे. अशा ठिकाणी राहिल्यास तुमच्या भावी पिढ्यांचंही नुकसान होतं.
जिथे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, कामाचा किंवा स्वभावाचा सन्मान होत नाही, तिथे थांबू नये. अशा ठिकाणी राहून वेळ आणि प्रतिमा दोन्ही खराब होतात.
संस्कार नसलेलं वातावरण मनुष्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतं. चाणक्य सांगतात की असे घर किंवा समाज त्वरित सोडावा.
जीवन स्थिर रहायला आर्थिक स्थैर्य गरजेचं असतं. रोजगार नसलेलं ठिकाण शेवटी गरिबी आणि संकटाकडे ढकलतं.
वाईट लोक, नकारात्मक बोलणारे किंवा इतरांना कमी लेखणाऱ्यांची सोबत टाळावी. त्यांचा प्रभाव तुमचं आयुष्य खराब करू शकतो.
जिथे फसवणूक, खोटेपणा किंवा चालाकीला प्राधान्य असतं, तिथे प्रामाणिक व्यक्ती टिकू शकत नाही. अशा ठिकाणांपासून दूर राहणं योग्य असतं.
चाणक्य सांगतात की सुरक्षितता नसलेलं ठिकाण व्यक्तीचा आत्मविश्वास आणि प्रगती दोन्ही नष्ट करतं. खूप वाद आणि नकारात्मकता असलेल्या वातावरणात व्यक्तीची मानसिक शांती नष्ट होते.
नियम, शिस्त, वेळेचं महत्त्व आणि चांगल्या वर्तनाला महत्त्व न देणाऱ्या ठिकाणी राहणं तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करू शकतं.