Sakshi Sunil Jadhav
30 वर्षांनंतर पार्टनर शोधणं कठीण वाटतं, पण अशक्य अजिबात नाही. करिअर, जबाबदाऱ्या, लाइफस्टाइल बदल यामुळे अनेकजण ३० नंतर रिलेशनशिपसाठी तयार होतात. परंतु योग्य व्यक्ती शोधण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली तर नातं अधिक मजबूत, स्थिर आणि कम्फर्टेबल होऊ शकतं.
या वयात नात्यात भावनिक समजुतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. समोरची व्यक्ती प्रगल्भ, शांत आणि समजूतदार आहे का याचा अंदाज घ्या.
परफेक्ट व्यक्ती नसते पण परफेक्ट पार्टनर असू शकतो. आधी स्वतःकडेही त्याच निकषांनी पाहा.
लाइफस्टाइल, विचारसरणी, कुटुंबाबद्दलचे दृष्टिकोन, भविष्याची योजना या गोष्टी जुळल्या तर नातं टिकण्याची शक्यता वाढते.
३० नंतर अनेकजण समाजाच्या दबावामुळे घाईघाईत निर्णय घेतात. पण नातं दीर्घकाळासाठी असतं म्हणून वेळ द्या, व्यक्तीला समजून घ्या.
काही वेळा सर्व गुण एखाद्यात नसतात, पण त्यांच्यातील चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.
स्पष्ट आणि ओपन कम्युनिकेशन ३० वयात नात्याचा पाया ठरतो. गैरसमज टाळण्यासाठी संवाद कौशल्य आवश्यक आहेत.
विश्वसनीय डेटिंग अॅप्स, मॅट्रिमोनी साइट्स किंवा कम्युनिटी प्लॅटफॉर्म्सद्वारे योग्य व्यक्ती शोधण्याची संधी वाढते.
नात्यात जाण्याआधी स्वतःची भावनिक, आर्थिक आणि मानसिक तयारी तपासा. योग्य अवस्थेत असाल तर योग्य पार्टनर आकर्षित होतो.