Sakshi Sunil Jadhav
पाणी प्रत्येक सजीवासाठी आवश्यक असते. बऱ्याचदा लोक धावपळीत पाण्याच्या बाटल्या विसरतात. त्यामुळे लोक सहज कोणत्याही दुकानातून बाटल्या विकत घेतात.
तुम्हाला माहितीये का? प्रत्येक बाटलीला वेगवेगळ्या रंगाची झाकणं का असतात? पुढे आपण याबद्दल सविस्तर सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
भारतात १९७० साली बाटलीबंद पाण्याची सुरुवात झाली. आता बाहेर जाताना लोक घरातून पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवणं टाळतात. कारण सहज कोणत्याही दुकानात पाण्याच्या बाटल्या उपलब्ध असतात.
पाण्याच्या बाटल्यांच्या आता मार्केटमध्ये स्पर्धा सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये बिस्लरी हा ब्रॅंन्ड लोकप्रिय मानला जातो. याचे एक कारण म्हणजे शुद्ध पाणी हे त्याच बाटलीत मिळते. असाच विविध पाण्याच्या बाटल्यांच्या झाकणाचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत.
पाण्याच्या बाटलीला निळ्या रंगाचे झाकण असेल तर हे स्प्रिंग वॉटरपासून तसेच मिनरल वॉटर असल्याचे समजले जाते.
तुम्ही घेतलेल्या पाण्याच्या बाटलीचे झाकण हिरव्या रंगाचे असेल तर पाणी स्वादयुक्त फ्लेवर्ड असतं.
तुम्ही विकत घेतलेलीचे झाकण जर पांढऱ्या रंगाचे असेल तर याचा अर्थ हे पाणी मशीनच्या साहाय्याने स्वच्छ केलेले आहे. त्यामुळे हे पाणी शक्यतो टाळणं योग्य ठरेल.
समजा प्रवासात तुम्ही पाण्याची बाटली घेतलीत आणि तिच्या झाकणाचा रंग हा काळा असेल तर ते पाणी अल्कलाइन वॉटर असतं. हे पाणी शरीरासाठी खूप आवश्यक असतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.