Sakshi Sunil Jadhav
हिवाळा सुरु होताच महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी दिसू लागली आहे. थंडगार हवा, दाट धुके, हिरवीगार दरी आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात येथे धुक्याची चादर दिसते आणि पडणाऱ्या पाण्याचा आवाज शांत वातावरण तयार करतो. फोटो काढण्यासाठी हा उत्तम स्पॉट आहे.
थंड पाण्याचा झरा आणि आजूबाजूचं घनदाट जंगल हे ठिकाण अनोखं ठिकाण आहे. कमी गर्दी असल्याने शांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम आहे.
महाबळेश्वरपासून थोड्याच अंतरावर असलेलं हे ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट आहे. हिवाळ्यातही नजारा मंत्रमुग्ध करतो.
मुख्य लेकवर गर्दी असली तरी बॅकसायड ट्रेल अतिशय शांत असते. फिरणे, फोटोशूट आणि सिल्व्हर फॉग अनुभवण्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
मुख्य टेबललँडवर गर्दी असते, पण मागील बाजूस शांत व्हॅली व्ह्यू पॉइंट्स आहेत जिथे रम्य दृश्यं दिसतात.
मुख्य पॉइंटपासून थोडं पुढे गेले की कमी गर्दी आणि धुक्यातून दिसणारी डोंगरांची रांग जास्तच सुंदर दिसते.
पारसी पॉइंट ऑफबीट व्ह्यूजवळ सूर्योदय आणि सूर्यास्त अप्रतिम दिसतो. गर्दीपासून दूर शांत पिकनिकसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
पर्यटक इथे फक्त फूडचा आनंद घेतात पण मागे काही नैसर्गिक वॉकिंग ट्रेल्स आहेत जे हिवाळ्यात स्वर्गासारखे दिसतात.
महाबळेश्वरपासून जवळ असलेला ऐतिहासिक किल्ला म्हणजे प्रतापगड. धुक्यात हा किल्ला अधिकच भव्य दिसतो. फॅमिली पिकनिक आणि ट्रेक दोन्हीसाठी उत्तम आहे.