Sakshi Sunil Jadhav
लग्नानंतर घरात एक शब्द कायम घुमतो “अहो… ऐकलंत का?” सकाळच्या चहापासून रात्रीच्या गप्पांपर्यंत हा शब्द बायकोच्या तोंडून अनेकदा ऐकू येतो. गंमत म्हणजे नवऱ्यालाही ही हाक अत्यंत गोड वाटते. पण याचा अर्थ अनेकांना माहित नाही.
पूर्वीच्या काळात नवरा-बायकोमध्ये वयाचा फरक मोठा असायचा. त्यामुळे नवऱ्याचे नाव घेणे अशिष्ट मानलं जात होतं. त्या आदरापासूनच “अहो” हा शब्द जन्माला आला. पण या शब्दामागे केवळ संस्कार नाहीत, तर प्रेम, आपुलकी आणि एक विशेष भावनिक नातं दडलं आहे.
संस्कृतमध्ये “अहो भाग्यम्” म्हणजे भाग्य, आनंद आणि प्रसन्नता. त्यामुळे नवऱ्याला “अहो” म्हणणं म्हणजे त्याच्याविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करणं. आजचा काळ बदलला असला तरी या शब्दातील उब, गोडवा आणि नात्यातली जवळीक आजही तशीच आहे.
जुन्या काळात नवऱ्याचे नाव घेणं अपमान कारक मानलं जायचं. त्यातूनच “अहो” हा सन्मानपूर्वक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूर्वी नवरा सहसा मोठ्या वयाचा असायचा, त्यामुळे नावाने बोलावणं टाळलं जायचं.
अहो म्हटल्यावर संवादात आपुलकी, प्रेम आणि सौम्यता येते. नवऱ्यालाही हा शब्द गोड वाटतो.
'अहो' म्हणजे भाग्य, आनंद, उत्साह. त्यामुळे बायको हा शब्द सन्मान आणि प्रेमाने वापरते. नवरा-बायकोमधील अंतर कमी करून हा शब्द नात्यात उब आणतो.
साधा संवादही मार्दवाने होतो. वादही शांतपणे संपवण्यासाठी हा शब्द उपयोगी पडतो.
नाव कठोर, पण “अहो” मऊ सुलभ आणि प्रेमळ वाटतं. भावना व्यक्त करणे सोपं होतं. जुन्या पिढीकडून आलेली ही परंपरा आजही अनेक घरात जतन केली जाते.
NEXT: Skin Care: चेहऱ्यावर अॅक्नेच्या समस्या वाढतायेत? मग हा १ घरगुती उपाय ठरेल बेस्ट, चमकदार दिसेल चेहरा