Sakshi Sunil Jadhav
आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे, जंक फूड आणि ताणतणावामुळे अॅक्नेच्या समस्या वाढताना दिसत आहेत. आयुर्वेदानुसार त्वचा स्वच्छ, चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार खूप गरजेचा आहे.
काही नैसर्गिक आयुर्वेदिक पदार्थ त्वचेचे pH संतुलन राखतात, सूज कमी करतात आणि अॅक्ने कमी करण्यास मदत करतात. नियंत्रित आहारासोबत हे सुपरफूड्स दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास त्वचा हळूहळू स्वच्छ, मऊ आणि ग्लोइंग होते.
कडुलिंब रक्तातील टॉक्सिन्स कमी करतो आणि त्वचेवरची सूज-पुरळ आटोक्यात आणतात. नियमित सेवनाने अॅक्नेची संख्या कमी होते.
तुळशीमध्ये भरपूर अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ती त्वचेवरील जीवाणू कमी करते आणि नवीन अॅक्ने येण्यापासून तुम्ही लांब राहू शकता.
आवळ्यामुळे त्वचेची चमक वाढते, आवळा कोलेजन तयार करण्यात मदत करतो आणि अॅक्नेचे डाग कमी करतो.
काकडीमध्ये भरपूर पाणी असते. हे त्वचेतील जलसंतुलन राखतं, कोरडेपणा कमी करतं आणि त्वचा शांत ठेवते.
हळदीतील कर्क्यूमिन सूज कमी करतो आणि त्वचा स्वच्छ ठेवतो. चेहऱ्यासाठी हळद-फेसपॅकही फायदेशीर आहे.
ताण हा अॅक्नेचा मोठा कारणकारक आहे. अश्वगंधा ताण कमी करते आणि त्याचा त्वचेवरील वाईट परिणाम कमी करते.
नारळपाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवते. हे नैसर्गिक टॉक्सिन क्लींझर असून अॅक्ने कमी करण्यास मदत करते.