Sakshi Sunil Jadhav
ब्रेन स्ट्रोक हा अचानक येणारा आणि जीवघेणा ठरू शकणारा आजार आहे. चुकीची जीवनशैली, वाढलेला ताण, धूम्रपान, रक्तदाबातील अनियमितपणा यामुळे स्ट्रोकचे प्रमाण वाढताना दिसते.
उच्च रक्तदाब हा स्ट्रोकचा सर्वात मोठा कारणकारक घटक आहे. बीपी 120 ते 80 च्या आसपास ठेवणे आवश्यक आहे. नियमित तपासणी करा.
रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) वाढल्यास रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. मधुमेह नियंत्रणात नसल्यास स्ट्रोकचा धोका दुपटीने वाढतो.
सिगारेट, गुटखा, पानमसाला यामुळे रक्तवाहिन्यांमधील कडकपण वाढतो. तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान सोडल्यानंतर धोका 50% नी कमी होतो.
वेगाने चालणे, सायकलिंग, योग, स्ट्रेचिंग यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळे कमी होतात.
जास्त तेलकट, मीठयुक्त, पॅकेज्ड फूड टाळा. आहारात फळे, भाज्या, नट्स, संपूर्ण धान्य, ओमेगा-3 असलेले अन्न वाढवा.
जास्तवेळ ताणात राहिल्यास रक्तदाब वाढतो. ध्यान, प्राणायाम, संगीत, पुरेशी झोप यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्त घट्ट होऊ शकते आणि क्लॉटिंगचा धोका वाढतो. दिवसाला किमान 7–8 ग्लास पाणी प्या.
वाढलेले वजन हे बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमुख कारण. BMI 25 च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करा.