Sakshi Sunil Jadhav
हिवाळा सुरू होताच पुण्यातील लोक सहलींचा, पिकनिकचा आणि निसर्गभेटीचा बेत आखू लागतात. थंडीच्या हवेत हिरवाई, धुकट सकाळ आणि डोंगराळ परिसर पाहण्यासाठी अनेक ठिकाणे अगदी परफेक्ट मानली जातात.
थंडीत सकाळच्या वेळेत टिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी दिसणारे पवन लेकचे दृश्य पर्यटकांना मोहित करते. ट्रेकसाठीही हे उत्तम ठिकाण आहे.
लोनावळ्याच्या मुख्य पॉइंटपासून थोडे दूर असलेली ही दरी हिवाळ्यात दाट धुक्याने वेढलेली असते. शांत जागा शोधणाऱ्यांसाठी परफेक्ट.
पावसाळ्यानंतर धबधब्याची तीव्रता कमी असली तरी हिवाळ्यात इथला निळसर पाण्याचा तलाव अप्रतिम दिसतो.
कमी गर्दी, स्वच्छ हवा आणि डोंगररांगांनी वेढलेला हा परिसर वनडे ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे.
पुण्यापासून अगदी जवळच हे सुंदर सूर्यास्ताचा ठिकाण आहे. शांत वातावरण आणि सुंदर लेक व्ह्यू पिकनिकसाठी ही मस्त जागा आहे.
हिवाळ्यात इथे मोठ्या प्रमाणात मोर पाहायला मिळतात. मुलांसह कुटुंबासाठी हा बेस्ट स्पॉट आहे.
मुळशी रोडवरील हे धरण पर्यटकांना कमी माहितीचे ठिकाण आहे. पिकनिक आणि फोटोग्राफीसाठी शांत आणि गर्दीपासून दूर हे ठिकाण बेस्ट आहे.
पुरंदर किल्ल्यावरची सकाळची थंडी आणि धुक्यातून दिसणारा निसर्ग मन मोहून टाकतो. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे टॉप लोकेशन आहे.