Sakshi Sunil Jadhav
आरोग्य तज्ञांच्या मते, अंजीर हे अत्यंत पौष्टिक फळ असून सकाळी रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास शरीरावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले अंजीर अनेक गोष्टी सुधारते.
अंजीर फायबरने समृद्ध असल्याने सकाळी ते खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते. अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने भूक कमी लागते आणि दिवसभर ओव्हरइटिंग होत नाही. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय.
अंजीरमधील व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. हिवाळ्यात विशेष उपयोगी.
रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि ग्लोइंग दिसते.
अंजीरमध्ये भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन K असते. नियमित सेवन केल्यास हाडांची ताकद वाढते.
अंजीरातील नैसर्गिक फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मर्यादित सेवन फायदेशीर.
अंजीरमध्ये आयर्नचे प्रमाण चांगले असल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. थकवा, कमजोरी कमी जाणवते.
अंजीरमधील अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स मेंदूचे कार्य सुधारतात, स्मरणशक्ती वाढवतात आणि ताण-तणाव कमी करतात.