Sakshi Sunil Jadhav
हिवाळ्यात अनेक जणांची तक्रार असते की चपात्या शेकताच कडक होतात. पण काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर रोट्या दिवसभर चपाती मऊ, मुलायम आणि ताजी राहू शकते. कणिक मळताना करून ठेवलेले छोटेसे उपाय चपातीला दुसऱ्या दिवशीही नरम ठेवतात.
कणिक मळताना दोन चमचे घी किंवा तेल घातल्यास कणिक सॉफ्ट होतं आणि चपाती जास्त वेळ नरम राहते.
थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने दुधाने कणिक मळल्यावर चपाती जास्त मऊ होते.
कणिक जितके चांगले मळले जाईल तितकी चपाती मऊ बनते. कोरडे किंवा नीट न मळलेले कणिक चपाती कडक करतो.
कणिक मळल्यावर ओल्या कापडाने झाकून 15 ते 20 मिनिटे ठेवले तर ग्लुटेन चांगले तयार होते आणि चपाती मऊ बनते.
चपाती कुठेही जाड-पातळ असेल तर ती लवकर कडक होते. एकसारखी जाडीची चपाती चांगली फुलते आणि नरम राहते.
तवा खूप गरम किंवा खूप थंड नसावा. योग्य मध्यम आचेवर चपाती उत्तम शिजते.
चपातीच्या दोन्ही बाजू नीट शिजल्या की ती मऊ राहते. नीट न शेकल्यास चपाती कडक बनते.
चपाती तयार झाल्यावर त्यावर थोडंसं घी किंवा बटर लावल्यास ती नरम राहते. चपाती उघडी ठेवली तर ती लगेच सुकते. झाकून ठेवली तर चपाती तासन्तास नरम राहते.