Digestion Problems : पचनाच्या समस्या वाढवणाऱ्या स्वयंपाकातील चुका, तुम्हीही करता का?

Healthy Cooking : पचनाच्या समस्यांचे खरे कारण स्वयंपाकातील छोट्या चुका असू शकतात. चुकीची शिजवणूक, अति मसाले, फॅटी अन्न यामुळे IBS, गॅस, पोटफुगी वाढते. योग्य पद्धतीने स्वयंपाक करा.
Remedies for Acidity
Home Remedies for Acidity yandex
Published On
Summary

चुकीच्या शिजवणुकीमुळे IBS, गॅस व पचनाच्या समस्या वाढतात.

जास्त मसाले, तेलकट पदार्थ आणि FODMAPs असलेले अन्न टाळावे.

वाफेवर, ग्रिल किंवा मंद आचेवर शिजवलेले अन्न पचायला सोपे असते.

कमी प्रमाणात आणि वेळेवर खाणे पचनासाठी फायदेशीर ठरते.

पचनाची समस्या ही दैनंदिन जीवनातली एक सामान्य वाटणारी समस्या झाली आहे. अचपचानाच्या समस्येला इरिटेबल बोवेल सिंड्रोम असे सुद्धा म्हणतात. बदलत्या लाईफस्टाईलमुळे लोकांना पचनाशी संबंधित समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. कारण चुकीच्या पद्धतीने शिजवलेले किंवा अति मसालेदार, तुपकट अन्न हे पचन बिघडवते आणि गॅस, पोटफुगी, वेदना अशा समस्या निर्माण करते.

काही पदार्थांमध्ये किण्वनक्षम कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यांना FODMAPs म्हणतात. हे आतड्यांमध्ये पुर्णपणे शोषले जात नाहीत आणि मोठ्या आतड्यात किण्वन होऊन गॅस, पोटफुगी, पेटके यासारख्या समस्या होतात. कांदा, लसूण, सफरचंद, गहू आणि बीन्स यामध्ये हे घटक आढळतात. असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाला त्रास होतो.

Remedies for Acidity
ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

रोजच्या स्वयंपाकात जास्त तेल, तूप किंवा लोणी वापरणेही आतड्यांसाठी घातक असते. जास्त फॅटी पदार्थ शरीरात हळू पचतात. परिणामी अन्न आतड्यात जास्त वेळ राहते आणि किण्वन प्रक्रियेमुळे गॅस व फुगी वाढते. ज्यांना IBS आहे. त्यांना अशा चरबीयुक्त अन्नामुळे त्रास जास्त होतो. यासाठी वाफेवर शिजवलेले, ग्रिल केलेले किंवा बेक केलेले अन्न खाणे फायदेशीर ठरते. जास्त प्रमाणात खाणे हेदेखील पचनाशी संबंधित समस्या वाढवते.

पोट भरून खाल्ल्याने पचनसंस्थेवर दबाव येतो. गॅस निर्मिती वाढते आणि पोटदुखीची समस्या उद्भवते. यासाठी अन्न कमी प्रमाणात व ठराविक वेळेत खाणे आवश्यक आहे. अनेक जण स्वयंपाक करताना उच्च तापमानाचा वापर करतात. मात्र उच्च तापमानावर शिजवलेल्या अन्नात ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स तयार होतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होऊन IBS रुग्णांची स्थिती अधिक बिघडू शकते. याउलट मंद आचेवर शिजवलेले अन्न पचायला सोपे आणि पौष्टिक असते.

Remedies for Acidity
Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी
Q

पचनाच्या समस्या का वाढतात?

A

चुकीची पद्धतीने अन्न शिजवणे, खूप मसाले, तेलकट व तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे आणि उच्च तापमानावर स्वयंपाक करणे यामुळे पचनसंस्था बिघडते.

Q

IBS रुग्णांसाठी कोणत्या गोष्टी धोकादायक ठरतात?

A

जास्त मसालेदार अन्न, चरबीयुक्त पदार्थ, FODMAPs असलेले अन्न (कांदा, लसूण, सफरचंद, गहू, बीन्स) आणि चुकीची स्वयंपाक पद्धत IBS रुग्णांना अधिक त्रास देते.

Q

पचन सुधारण्यासाठी कोणती अन्न शिजवण्याची पद्धत उत्तम आहे?

A

वाफेवर शिजवणे, ग्रिल करणे, बेक करणे आणि मंद आचेवर स्वयंपाक करणे हे पचनासाठी सर्वात चांगले व पौष्टिक ठरते.

Q

गॅस व पोटफुगी कमी करण्यासाठी काय करावे?

A

एकावेळी जास्त न खाता कमी प्रमाणात, ठराविक वेळेत खावे. तेलकट आणि जड पदार्थ टाळावेत. पचायला सोपा आहार निवडावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com