Sakshi Sunil Jadhav
ज्वारीते पीठ, जाड रवा, दही, फ्रुट सॉल्ट, हिरव्या मिरच्या, मीठ, तेल, हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर इ.
सगळ्यात आधी एक मिक्सरचे भांडे स्वच्छ धुवून घ्या.
आता त्यामध्ये ज्वारीचं पीठ, रवा, दही आणि मिरच्यांची बारिक पेस्ट तयार करा.
त्यामध्ये मीठ मिक्स करुन घ्या. मग थोडं पाणी घेऊन इडलीच्या पिठासारखे पीठ तयार करुन घ्या.
मिश्रणात आता फ्रुट सॉल्ट मिक्स करुन कुकरमध्ये पाणी गरम उकळल्यावर मिश्रण ठेवा.
मिश्रण संपूर्ण सुकायला आणि फुलायला साधारण १५ मिनिटे लागतील. नंतर ढोकळ्याची फोडणी तयार करा.
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरं, मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी घालून वरुन कोथिंबीर भुरभुरावी.