Migraine
MigraineSaam tv

Migraine: च्विंगम, कोक किंवा सोडा पिताय? आताच सावध व्हा, अन्यथा गंभीर आजाराचा करावा लागेल सामना

Artificial Sweeteners Leads to Migraine: आपण अनेकदा साखर नको म्हणून डाएट सोडा किंवा कोक पितो परंतु यामुळे तुम्हाला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Published on

सध्याच्या काळात प्रत्येकजण बाहेरचे पदार्थ खातात. यामध्येही अनेक प्रकार असतात. त्यामध्ये हेल्दी किंवा कमी कॅलरी असणारे ऑप्शन अनेकजण शोधतात. यासाठी शुगर फ्री मिठाई, पॅकेज्ड फूड आणि डाएट कोक किंवा सोडा असे पदार्थ खातात. दरम्यान, या पदार्थांमुळे तुमच्या शरीरातील कॅलरी कमी होते. परंतु अनेकांना मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.

Migraine
Stomach cancer: पोटाचा कॅन्सर झाल्यावर शरीरात कोणते बदल दिसून येतात?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टफिशियल स्वीटनरमुळे हे काही लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल ट्रिगर म्हणून काम करतात. यामुळे एस्पार्टम सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या गोष्टींवर परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी वाढू शकते.

संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार, हा त्रास मायग्रेन, चिंता करणाऱ्या, हार्मोनल असंतुलन किंवा झोपेचा अभाव असणाऱ्या लोकांमध्ये सामान्य आहे. आर्टफिशियल गोड पदार्थ खाल्यानंतर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना लोकांना आधीपासूनच मायग्रेनचा त्रास आहे. ज्यांची झोप ककमी आहे किंवा कॅफेनयुक्त पदार्थ जास्त खातात. प्रीडायबिटीज आहे. त्यांना या गोष्टींचा धोका जास्त असतो.

डाएट सोडा जर तुम्ही पित असाल तर तुम्हाला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. डाएट सोडामध्ये जरी साखर नसली तरी ते रक्तातील साखरेवर परिणाम करु शकतात. यामुळे इन्सुलिनचे संतुलन बिघडू शकते. परिणाम रक्तातील साखरेची पातळी वाढू किंवा कमी होऊ शकते.

Migraine
Elderly health awareness: वयस्कर व्यक्तींना पाय घसरून पडणंही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांनी सांगितलं पडण्यापासून कशी घ्यावी काळजी?

कृत्रिमरित्या बनवलेले गोड पदार्थ आतड्यांवरही परिणाम करतात. हे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया कमी करु शकतात. यामुळे गॅस, अॅसिडिटी, पचनाची समस्या होऊ शकतो. याचसोबत मूड आणि डोकेदेखीवरदेखील परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी १२ हे मायग्रेन कमी करण्यास मदत करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त कॅलरी कमी करुन चालणार नाही. तुम्हाला उत्तम-संतुलित आहार करायला हवा.

Migraine
Loneliness Health Impact: एकटेपणामुळे तुम्हाला होऊ शकतात इतके आजार; पाहा कशी दिसून येतात याची लक्षणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com