Stomach cancer: पोटाचा कॅन्सर झाल्यावर शरीरात कोणते बदल दिसून येतात?

Surabhi Jayashree Jagdish

पोटाचा कॅन्सर

पोटाचा कॅन्सर हा हळूहळू वाढणारा आजार असल्यामुळे सुरुवातीला लक्षणं फारशी ठळक लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा रुग्ण दुर्लक्ष करतो.

शरीरात बदल

पोटाच्या कॅन्सरचा आजार वाढू लागल्यावर शरीरात काही स्पष्ट बदल जाणवू लागतात. ही लक्षणं वेळेत ओळखली तर तपासणी करून त्यावर योग्य उपचार घेणं शक्य होतं.

सतत अपचन

नेहमी अपचन होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा थोडं खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखं वाटणं. साध उपाय करूनही आराम मिळत नाही. हे पोटाच्या कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

भूक न लागणं

नेहमी आवडणारे पदार्थही आपण खात नाही. थोडं खाल्ल्यावर लगेच पोट भरल्यासारखं वाटतं. हळूहळू जेवणाचं प्रमाण खूप कमी होतं.

वजन झपाट्याने कमी होणं

कसलाही व्यायाम किंवा डाएट न करता वजन घटतं. शरीर अशक्त आणि थकलेलं वाटू लागतं. हे कॅन्सरमुळे शरीरातील पोषण नीट शोषलं जात नाही याचं लक्षण असू शकतं.

पोटदुखी किंवा जळजळ

पोटाच्या वरच्या भागात सतत दुखणं किंवा जळजळ जाणवते. जेवणानंतर वेदना वाढू शकतात. दुखणं दिवसेंदिवस तीव्र होत जातं.

मळमळ, उलटी

वारंवार मळमळ होणं किंवा उलटी होणं दिसतं. कधी कधी उलटीत रक्त दिसू शकतं. हे गंभीर लक्षण असून त्वरित डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असतं.

शौचाचा रंग बदलणं

शौचाचा रंग बदलून काळा झाल्यास तुम्ही सावध राहिलं पाहिजे. हे आतून रक्तस्राव होत असल्याचे संकेत आहेत. कधी कधी यावेळी शौचातंही रक्त दिसू शकतं.

Borivali Tourism: थंडीच्या दिवसात बाहेर भटकायला जायचंय? लांब न जाता बोरिवलीच्या या ठिकाणी फिरून या

येथे क्लिक करा