

वाढत्या वयामुळे व्यक्तीची शरीराची ताकद कमी होते. यामुळे तोल सांभाळण्याची क्षमता आणि हाडांची घनता कमी होत जाते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या दुखापतींचा धोका वाढतो. घरात किंवा बाहेर साध्या कारणांमुळे होणाऱ्या या दुखापती कधीकधी गंभीर रूप धारण करू शकतात असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
पडणं, फ्रॅक्चर आणि सांध्यांच्या दुखापती या वृद्ध लोकांसाठी सर्वात सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक आहेत. म्हणूनच योग्य ती खबरदारी घेतल्यास त्यांना दुखापतीची शक्यता कमी करण्यास मदत होईल.
मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलमधील आर्थोपेडिक आणि जॉईट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीसनत राव यांनी सांगितलं की, जसजस वय वाढतं, तसतसं शरीराचा तोल जाणं, स्नायूंची ताकद कमी होणं आणि इतर वैद्यकीय समस्यांसारख्या घटकांमुळे दुखापतींचा धोका वाढतो. वृद्धांमधील दुखापती बहुतेकदा रात्री आणि बाथरूममध्ये होतात. ज्याठिकाणी घसरणं आणि पडणं सामान्य आहे. याशिवाय चक्कर येणं, भोवळ येणं किंवा औषधांचे दुष्परिणाम यांसारख्या वैद्यकीय समस्यांमुळे अपघातांची शक्यता वाढते. वृद्धांमध्ये सांधे आणि ऊतींच्या दुखापती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पडल्यामुळे मऊ ऊतींना, विशेषतः मनगट आणि नितंबांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे, मनगटाच्या दुखापतींमध्ये बहुतेकदा मुरगळणे किंवा फ्रॅक्चरसारखी समस्या उद्भवते.
डॉ. राव यांनी पुढे सांगितलं की, कंबरेखालच्या दुखापती गंभीर असतात. कारण जर त्यांच्यावर त्वरित उपचार केले नाहीत तर त्यामुळे शारीरीक हालचालींवर मर्यादा येतात. परिणामी रूग्णाला भविष्यातही त्रास होतो. शरीराचा तोल जाणं, स्नायूंची ताकद कमी होणं आणि दृष्टीदोष यामुळेही वयोवृद्धांमध्ये तोल जाऊन पडण्याची शक्यता वाढते. वृद्ध व्यक्तींमधील दुखापतींमुळे दीर्घकाळ हालचाल थांबणं, बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागणं आणि दैनंदिन कामासाठी इतरांवर अवलंबून रहावं लागतं. या दुखापतींमुळे रुग्णाला रोजच्या कामात देखील अडथळा येतो आणि त्यामुळे तणाव आणि चिंता वाढू शकतात.
मनगट आणि कबंर ही वृद्धांमध्ये सर्वात सामान्यपणे दुखापत होणारी हाडं आहेत. मनगटाला दुखापत झाल्यास त्यावर बर्फाने शेकवं आणि दुखापत झालेला सांधा वाकवू न देता मनगटाच्या स्प्लिंटचा वापर करून स्थिर ठेवावं. पडल्यानंतर हिप्सच्या वेदनेसाठी सुरुवातीला बर्फ लावता येतो. मात्र असं केल्यानंतर त्वरीत रुग्णाला उभं रहायला सांगू नका आणि एक्स-रे तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात न्या. सर्व दुखापतींसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते. उपचारांचे निर्णय हे फ्रॅक्चरचा प्रकार, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय स्थिती यावर अवलंबून असतात.
चालताना काठीचा वापर करा
रात्रीच्या वेळीच शौचालयाचा वापर करावा लागतो, अशावेळी शौचालयाचा लाईट सुरुच राहु द्या.
रात्रीच्या वेळी बेडरूममध्ये एक छोटा दिवा लावून ठेवा,
रात्रीच्या वेळी शौचालयाचा वापर करताना सोबत कोणीतरी असेल याची खात्री करा
वस्तू उचलण्यासाठी शिडीचा वापर करणे किंवा उंचावर चढणे टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.