Stop eating sugar two weeks: दोन आठवडे साखर खाणं सोडलं तर? हार्वडच्या डॉक्टरांनी सांगितलं शरीरावर कसा होतो परिणाम

No sugar diet benefits: साखर ही आपल्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. पण जास्त प्रमाणात साखर सेवन केल्याने स्थूलता, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या समस्या उद्भवतात.
No sugar diet benefits
No sugar diet benefitssaam tv
Published On

आपल्यापैकी अनेकांना गोड पदार्थ खूप आवडतात. काहींना गोड पदार्थ इतके आवडतात की सकाळी किंवा संध्याकाळी कधीही गोड पदार्थ खाऊ शकतात. असं म्हणतात, गोड पदार्थ खाल्ल्याने वजनात वाढ होते. आर्टिफिशियल शुगर किंवा एखाद्या पदार्थावरून घेण्यात येणारी साखर आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, जास्त साखर खाल्ल्याने केवळ लठ्ठपणा वाढत नाही तर हृदयविकाराचा झटका, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि अगदी कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, जर तुम्ही फक्त २ आठवड्यांसाठी तुम्ही साखर खाल्ली नाही तर काय होईल?

या प्रश्नाचं उत्तर एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि लिवर तज्ज्ञ डॉ. सौरभ सेठी यांनी दिलंय. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी १४ दिवसांचं नो शुगर चॅलेंज तुमच्या आरोग्यात कसा बदल घडवू शकतं हे स्पष्ट केलंय.

साखर सोडल्यानंतर तुमच्या शरीरात कसे होतात बदल?

डॉ. सेठी यांनी सांगितलंय की, साखर केवळ कॅलरीजच वाढवत नाही तर तुमची भूक, हार्मोन्स आणि लिव्हरवरही नकारात्मक परिणाम करते. जेव्हा तुम्ही साखर खाणं सोडता तेव्हा तुमच्या शरीरात दोन प्रकराचे बदल होतात.

No sugar diet benefits
Early signs of stroke: शरीरात ही ५ लक्षणं दिसली तर समजा स्ट्रोक येऊ शकतो; संकेत ओळखून करा उपाय

साखर सोडताना तुम्हाला सुरुवातीच्या काळात काही अडचणी येऊ शकतात. ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे-

  • गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होणं

  • सौम्य डोकेदुखी

  • चिडचिडेपणा किंवा कामात रस नसणं

काही दिवसांनंतर तुम्हाला स्वतःमध्ये एक चांगला फरक दिसून येऊ शकतो.

  • गोड खाण्याची तुमची इच्छा आपोआप कमी होते.

  • दिवसभर उर्जेची पातळी चांगली राहिल.

  • पोटात जडपणा आणि सूज दूर होणं.

  • इन्सुलिनचा प्रतिसाद सुधारणार आहे.

डॉक्टरांनी सांगितलं की, पॅकेज्ड ज्यूस, फ्लेवर्ड दही, एनर्जी बार, सॉस आणि बेकरी प्रोडक्ट्स यांसारख्या हेल्दी वाटणाऱ्या पदार्थांमध्येही अनेकदा साखर असते. त्या पदार्थांवर देण्यात आलेल्या लेबल्सवर विश्वास ठेऊ नका

No sugar diet benefits
Kidney stone symptoms: 'ही' लक्षणं दिसत असतील समजा किडनीमध्ये झालेत स्टोन; शरीरातील बदल ओळखून वेळीच उपचार करा

दुसऱ्या आठवड्यात ५ मोठे बदल दिसून येतील

ज्यावेळी दुसऱ्या आठवड्यात देखील साखर खात नाही तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये दिसतील हे बदल

  • पोटाची चरबी कमी होणं

  • तुम्हाला चांगली झोप येईल

  • भूक कमी होईल

  • चयापचय क्रिया सुधारते

  • चवीतील बदल

No sugar diet benefits
Cholesterol symptoms on face: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसून येतात हे ५ प्रमुख बदल; वेळीच ओळखा लक्षणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com