

हिवाळ्यात किंवा अनुवंशिकतेमुळे स्नायू दुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यात एलजीएमडी हा अनुवांशिक स्नायू विकारांचा एक समूह आहे जो प्रामुख्याने नितंब आणि खांद्याच्या स्नायूंवर परिणाम करतो, ज्यामुळे स्नायुमध्ये कमकुवतपणा जाणवतो. लिंब-गर्डल मस्कुलर डिस्ट्रॉफीमुळे पीडित रुग्णांना अनेकदा शारीरिक मर्यादा तसेच आव्हानांचा सामना करावा लागतो. पारंपारिक उपचारांनी औषधांचा वापर करुन लक्षणे व्यवस्थापित केली जातात.
रीजनरेटिव्ह मेडिसिन संशोधक आणि स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्यूशन्स इंडियाचे संस्थापक, डॉ प्रदीप महाजन म्हणतात की, क्रांतिकारी संशोधन करत रुग्णांमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यासाठी औषधे खाण्याची गरज भासणार नाही. पेशींचा वापर करुन गंभीर आजारावर (Disease) मात करता येईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एलजीएमडीमध्ये 30 हून अधिक ओळखल्या गेलेल्या उपप्रकारांसह अनुवांशिक स्नायू विकारांच्या विविध प्रकारांचा समावेश आहे, प्रत्येकी भिन्न जीन्समधील म्युटेशनमुळे होतो. या म्युटेशनमुळे खांदे, हात, ओटीपोट आणि मांडीचे स्नायू कमकुवत होतात. ज्यामुळे हालचालीसंबंधीत समस्या आणि जीवनाची गुणवत्ता कमी होते. एलजीएमडी रूग्ण सामान्यत: त्यांची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी शारीरिक उपचार, सहाय्यक उपकरणे आणि औषधांवर (Medicine)अवलंबून असतात.
लिंब-गर्डल मस्कुलर डिस्ट्रॉफी (एलजीएमडी) असलेल्या रूग्णांच्या उपचारांसाठी रिजनरेटिव्ह मेडिसिन आशादायक मार्ग प्रदान करते. स्टेम सेल थेरपी आणि जीन एडिटिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रांचा उपयोग करून, रिजनरेटिव्ह मेडिसिन्समध्ये रूग्णांच्या स्नायूंचे कार्य पुनर्संचयित करणे तसेच ते वाढवण्याची क्षमता आहे. खराब झालेल्या स्नायूंच्या ऊतींच्या दुरुस्तीसाठी स्टेम सेल्सचा वापर केला जाऊ शकतो. ही नाविन्यपूर्ण पध्दत रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी, रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.
डॉ. महाजन (रिजनर्टिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट), त्यांनी एलजीएमडी आणि इतर स्नायू-संबंधित परिस्थितींवर नाविन्यपूर्ण उपचार शोधण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्याचा दृष्टीकोन शरीराच्या नैसर्गिक उपचार क्षमतांचा उपयोग करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून मानवी शरीराच्या अविश्वसनीय पुनरुत्पादक क्षमतेवर भर देतो. एलजीएमडीसाठी पारंपारिक उपचारांचा उद्देश प्रामुख्याने लक्षणे (Symptoms) व्यवस्थापित करणे आणि रोगाची प्रगती कमी करणे हे आहे. आपल्या शरीरात खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती आणि पुनरुत्पादन करण्याची अंतर्निहित क्षमता आहे. या पुनरुत्पादक क्षमतांना दीर्घकाळ प्रदान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले.
सेल-आधारित उपचारांवर स्टेमआरएक्स केंद्रांवर डॉ. महाजन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे . रुग्णाच्या स्वतःच्या पेशी वापरुन आजार बरे करण्याची त्यांची कल्पना आहे. स्टेम सेल्सने विशेषतः खराब झालेल्या स्नायूंच्या ऊतींचे पुनरुत्पादन करण्यात विशेष महत्त्व प्राप्त करुन दिले आहे. आमच्या संशोधन आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये पुनर्जन्मात्मक उपचारांच्या वापराद्वारे स्नायूंच्या कार्यामध्ये आणि LGMD रूग्णांच्या जीवनाच्या एकूण गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा दिसून आल्या आहेत.
बॉडीज रिपेअरिंग किट्स
आपल्या शरीराच्या अंतर्निहित क्षमतेचा वापर केल्यास कित्येक आजार दूर करता येऊ शकतात. स्टेम पेशी आणि इतर रिजनरेटिव्ह उपचार नैसर्गिक दुरुस्तीच्या प्रक्रियेला उत्तेजन देत एक उत्प्रेरक म्हणून काम करतात असे डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले. ज्या रुग्णांनी स्टेमआरएक्स येथे रिजनरेटिव्ह उपचार घेतले आहेत त्यांनी स्नायूंची उर्जा, गतिशीलता आणि जीवनाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा नोंदवल्या आहेत.
डॉ. महाजन यांच्या संशोधनामुळे एलजीएमडी रूग्णांना आशेचा किरण मिळाला आहे. या उपचारांची प्रभावीता दृढ करण्यासाठी पुढील संशोधन आणि क्लिनिकल चाचण्या आवश्यक असून भविष्यात आशेचा किरण मिळू शकतो. डॉ. महाजन यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनामुळे मस्क्यूलर डिस्ट्रॉफी हे एक आव्हान नसून आता ते प्रभावीपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.