Parenting Tips : पालकांनो, हिवाळ्यात मुलांचे थंडीपासून कसे कराल संरक्षण? अशी घ्या काळजी

Child Care Tips : पुण्याच्या बालरोग तज्ज्ञ आणि समुपदेशक, अंकुरा हॉस्टिपटलच्या डॉ. सीमा जोशी यांनी सांगितले की, हिवाळ्यात मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. वातावरणातील बदलामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. जर तुमचेही मुल लहान असेल तर या गोष्टी लक्षात ठेवाच
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Winter Care Tips :

हिवाळ्यात तापमानात घट झाल्यामुळे मुलांना सर्दी, खोकला आणि वाहणारे नाक यांसारख्या श्वसनमार्गाच्या संसर्गाची शक्यता असते. आपल्या मुलांना घरात बंदिस्त करुन ठेवणे हा त्यावरील उपाय नाही.

पुण्याच्या बालरोग तज्ज्ञ आणि समुपदेशक, अंकुरा हॉस्टिपटलच्या डॉ. सीमा जोशी यांनी सांगितले की, हिवाळ्यात मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. वातावरणातील बदलामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. जर तुमचेही मुल लहान असेल तर या गोष्टी लक्षात ठेवाच. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. हिवाळ्यात उबदार कपडे घाला

हिवाळ्याच्या दिवसात (Winter Season) मुलांना उबदार ठेवणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुलांसाठी ज्यांना सर्दी होण्याची अधिक शक्यता असते त्यांना उबदार कपडे घाला. मुलांसाठी बूट, मोजे, टोपी आणि हातमोजे यांसारख्या वस्तू वापरायला विसरु नका. यामुळे थंडीपासून बचाव करता येईल.

Parenting Tips
Bad Habits : या ९ वाईट सवयींमुळे तुम्ही होणारचं नाही Slim

2. हातांची स्वच्छता

सर्दी आणि फ्लु सारख्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी मुलांना साबणाने आणि पाण्याने वारंवार हात धुण्यास प्रोत्साहन द्या. मुलांना (Kids) आवश्यक फ्लू शॉट्स मिळाल्याची खात्री करा आणि लसीकरण चुकवू नका. शिंकताना तसेच खोकताना त्यांना तोंडासमोर रुमाल धरायला सांगा.

3. हिवाळ्यातही भरपुर पाणी प्यायला द्या

थंड हवामानात अनेकदा तहान लागत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी मुलांना हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. कोमट हळदीचे दूध प्यायला देणे हे देखील हिवाळ्याच्या महिन्यांत प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करू शकतात.

Parenting Tips
Bad Cholesterol ला शरीराच्या बाहेर फेकून देतात या ५ भाज्या, रोज सेवन केल्याने Blood Vessel होईल क्लीन

4. रोगप्रतिकारशक्ती वाढवा

हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या मुलांना संतुलित, पौष्टिक आहार मिळावा याची खात्री करणे महत्वाचे आहे. लहान मुलांना थंड हवामानात भूक लागत नाही, परंतु त्यांना निरोगी ठेवण्यासाठी नियमित पौष्टिक आहार द्या.

5. पौष्टिक आहार

तुमचे मूल पौष्टिक आहार (Food) घेत असल्याची खात्री करा. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सला रोजच्या जीवनात समाविष्ट करा कारण ते शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तुमच्या मुलास संत्री, टोमॅटो, खरबूज, पपई आणि हिरव्या भाज्यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले अन्न आणि ब्रोकोली, फ्लॉवर, पुदिना आणि आले यांसारखे हायड्रेटिंग पदार्थ द्यायला विसरु नका.

Parenting Tips
Famous Place In Nagpur : नागपूरमधील ही पर्यटनस्थळे स्वर्गच, बजेटमध्ये करा फिरण्याचा प्लान!

6. तुमच्या मुलांना दैनंदिन शारीरिक व्यायामासाठी प्रोत्साहन द्या

यामुळे त्यांची सर्दी आणि इतर आजारांची संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते. नियमित व्यायामामुळे शरीराच्या संरक्षणास चालना मिळते, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचे मूल तंदुरुस्त राहता आणि वारंवार होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी तयार राहता. सायकल चालवणे, जॉगिंग, धावणे किंवा दोरी उड्यांसारखे व्यायामाचे करुन घ्या. थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही मुलांना इनडोअर खेळाचे पर्याय उपलब्ध करून द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com