Bad Cholesterol ला शरीराच्या बाहेर फेकून देतात या ५ भाज्या, रोज सेवन केल्याने Blood Vessel होईल क्लीन

High Cholesterol : शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. हाय कोलेस्ट्रॉलमुळे शिरा ब्लॉक होतात. तर खराब कोलेस्ट्रॉल हे शिरांमध्ये जमा होऊ लागते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
Bad Cholesterol
Bad CholesterolSaam Tv
Published On

How To Control Bad Cholesterol :

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. हाय कोलेस्ट्रॉलमुळे शिरा ब्लॉक होतात. तर खराब कोलेस्ट्रॉल हे शिरांमध्ये जमा होऊ लागते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

आपण खालेल्या अन्नपदार्थातून दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल तयार होते. त्यात एक चांगले कोलेस्ट्रॉल तर दुसरे खराब कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉल हे आरोग्याासाठी घातक आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष द्यायला हवे. आहारात असे अनेक पदार्थ असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हालाही कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर या ५ भाज्यांचे आहारात सेवन रोज करा.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या भाज्या

1. कोबी

हिवाळ्यात कोबीची भाजी बाजारात पाहायला मिळते. यासाठी कोबीचा आहारात समावेश करा. फायबर युक्त कोबी खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते. कोबी खाल्ल्याने रक्तातील (Blood) चरबी आणि रक्तातील साखर (Sugar) कमी होण्यास मदत होते.

Bad Cholesterol
Jowar Upma Recipe : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल ज्वारीचा उपमा, पचनही सुधारेल; थंडीच्या दिवसात चव चाखाच

2. बीन्स

बीन्स खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व (Vitamins), खनिजे मिळतात. याचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होते. तसेच रक्तवाहिन्या मजबूत होतात. यामध्ये असणारे फायबर पचनसंस्था मजबूत करते.

3. भेंडी

कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी आपल्या आहारात भेंडीचा समावेश करावा. भेंडी ही आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानली जाते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते.

Bad Cholesterol
Aloe Vera Side Effects : सिल्की आणि शायनी केसांसाठी कोरफडचा वापर करताय? दुष्परिणामही वाचा

4. लसूण

हिवाळ्यात लसणाचे सेवन अवश्य करायला हवे. यामुळे शरीराला उब मिळते. लसणात आढळणारे घटक खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. लसूण खाल्ल्याने रक्तदाबही कमी होऊ शकतो. हृदयरोगासाठी लसूण फायदेशीर आहे.

5. वांगी

उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात वांग्याचा समावेश करा. वांग्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com