कोमल दामुद्रे
हिवाळ्यात वाढत्या वजनावर नियंत्रणासाठी ठेवण्यासाठी आपण व्यायाम करतो.
आपल्या वाईट सवयींमुळे वजन कमी होण्याऐवजी ते अधिक वाढते.
२ दिवसात वजन कमी करण्याच्या नादात आपण आपले ध्येय चुकवतो. आपल्या शरीरावरुन कळते की, किती दिवसात वजन कमी करु शकतो.
खरेच वजन कमी करायचे असेल तर व्यायाम आणि आहारात बदल करायला हवा.
अचानक जेवण सोडल्याने केवळ शरीर कमकुवत होते. जर योग्य पद्धतीने डाएटिंग केल्यास वजन कमी करण्यास पद्धत होईल.
वजन कमी करण्याचा निर्णय उद्यावर ढकलू नका. त्यासाठी वजन कमी करताना काही गोष्टी ठरवा
बरेचदा वजन कमी करताना निराशा येते. त्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
व्यायाम करताना तो योग्य प्रकारे करा. व्यायाम, वेट लिफ्टिंग आणि उच्च तीव्रतेचे व्यायाम आरोग्यास हानिकारक असतात.