High Blood Pressure च्या समस्येवर फायदेशीर ठरतील ड्रायफ्रूट्स, डाएटमध्ये आजच समावेश करा

Dry Fruits for Hypertension : चुकीची जीवनशैली, अपुरी झोप, कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, मिठाचे अधिक प्रमाणात सेवन आणि अनुवांशिकता यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. परंतु, या आजारावर नियंत्रण मिळवणे कठीण होते.
High Blood Pressure
High Blood PressureSaam tv
Published On

Hypertension Symptoms :

बदलत्या जीवनशैलीनुसार आजकाल सरार्स आजार बळावतात त्यातील एक हाय बीपी. हल्ली याचे वाढते प्रमाण तरुणांमध्ये पाहायला मिळते. जगभरात देखील रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे.

चुकीची जीवनशैली, अपुरी झोप, कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, मिठाचे अधिक प्रमाणात सेवन आणि अनुवांशिकता यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. परंतु, या आजारावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. औषधांव्यतिरिक्त आहाराद्वारेही यावर आजारावर मात करता येते. त्यासाठी आहारात कोणत्या ड्रायफ्रूट्सचा समावेश करायला हवा जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. काजू

काजूमध्ये असलेले उच्च पोटॅशियम आणि कमी सोडियम घटक उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यासाठी उच्च रक्तदाबासाठी काजू उपयुक्त ठरेल.

High Blood Pressure
High Blood Pressure : सायलेंट किलरचा आजार हाय बीपी! झोपेतून उठताच ही लक्षणे दिसल्यास घ्या काळजी...

2. आलुबुखार

आलुबुखार मध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे उच्च रक्तदाबाची लक्षणे (Symptoms) कमी करण्यास मदत करतात. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला आलुबुखार खाल्ल्याने फायदा (Benefits) होईल.

3. मनुका

मनुका हे गोड पदार्थांची चव वाढवते. त्यातील पोषक तत्वांमुळे, रक्तदाब कमी करण्यासाठी सगळ्यात चांगले सूपरफूड मानले जाते. मनुक्यामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

4. बदाम

स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी बदामाचे सेवन केले जाते. अनेत पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येतही खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात अल्फा-टोकोफेरॉल असते, जे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असते.

High Blood Pressure
Bad Habits : या ९ वाईट सवयींमुळे तुम्ही होणारचं नाही Slim

5. अक्रोड

लोह,झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन (Vitamins) ई आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अक्रोड हाय बीपीवर प्रभावी ठरु शकते. अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

6. पिस्ता

कॅलरी कमी करण्यासाठी पिस्ता अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरमध्ये समृद्ध आहे. तसेच हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पिस्त्याचे सेवन फायदेशीर ठरेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com