Brain Tumor Awareness : डोकेदुखीमागे मेंदूचा ट्युमर असू शकतो का? वेळीच ओळखा लक्षणं अन्यथा...

Headache Warning Signs : डोकेदुखीमागे गंभीर कारण तर नाही ना? ब्रेन ट्युमरची प्रमुख लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला येथे वाचा.
Symptoms of Brain Tumor
Brain TumorSaam TV
Published On

डोकेदुखी ही एक अत्यंत सामान्य तक्रार आहे. अनेकदा आपण विनोदानेसुद्धा "डोकेदुखी झालीय" असं म्हणतो. पण जर तुम्हीही गुगल किंवा ChatGPT वर "डोकेदुखी का होते?" असं शोधत असाल, तर तुमच्या नजरेसमोर ‘ब्रेन ट्युमर’ किंवा ‘कॅन्सर’ हे शब्द आले असतील आणि ते ऐकून भीती वाटली असेल.

Symptoms of Brain Tumor
Konkan Trip : कोकणात प्लान करा पावसाळी ट्रिप, 5 बेस्ट मॉन्सून स्पॉट

खरं सांगायचं झालं, तर डोकेदुखीमागे अनेक सामान्य कारणं असतात. मायग्रेन, सायनस, डोळ्यांवर ताण, चुकीची बैठक, तणाव, कमी झोप, शरीरात पाणी कमी होणं किंवा डोक्याला लागलेली इजा ही सगळी सामान्य कारणं आहेत. पण काही वेळा डोकेदुखीमागे काही गंभीर कारणंही असू शकतात. त्यातलंच एक दुर्मिळ पण महत्त्वाचं कारण म्हणजे ‘मेंदूचा ट्युमर’. पुढे आपण याबद्दल डॉ. रिद्धीज्योती यांचे मत आणि खरे कारण जाणून घेणार आहोत. या सल्लागार रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, एचसीजी कॅन्सर सेंटर येथे सध्या कार्यरत आहेत.

जरी ब्रेन ट्युमर हा सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी फक्त २% रुग्णांमध्ये आढळतो, तरी तो ओळखायला थोडा कठीण असतो कारण सुरुवातीची लक्षणं ही हलकीसरशी आणि गोंधळात टाकणारी असू शकतात. त्यामुळे लवकर निदान करणं कठीण ठरतं. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या माहितीनुसार, दरवर्षी अमेरिकेत सुमारे २५,००० लोकांमध्ये मेंदू आणि मणक्याशी संबंधित ट्युमर आढळतात. भारतातही ही संख्या वाढतेय, विशेषतः ३० ते ५० वयोगटातील रुग्णांमध्ये ट्युमरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मग, कधी साधी डोकेदुखी 'सावध' होण्याचं लक्षण असू शकते? हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे कारण वेळेत लक्ष न दिल्यास त्रास वाढू शकतो.

Symptoms of Brain Tumor
Crispy Onion Bhaji : पावसाला झाली सुरुवात, लगेचच करा कुरकुरीत कांदा भजीचा बेत

ट्युमरमुळे होणाऱ्या डोकेदुखीची काही खास वैशिष्ट्यं असतात:

1. सतत आणि तीव्रतेने वाढणारी डोकेदुखी

ही डोकेदुखी सतत राहते आणि वेळोवेळी तीव्र होत जाते. इतर डोकेदुखींपेक्षा ती जास्त वेळ टिकते आणि अधिक त्रासदायक असते.

2. वेळ आणि कारणं

सकाळी उठल्यावर किंवा रात्री ही डोकेदुखी अधिक जाणवते. झोपताना किंवा पुढे वाकल्यावर ती वाढते.

3. औषधांचा परिणाम होत नाही

सामान्य पेनकिलर्स घेतल्यावरसुद्धा यामध्ये फारसा आराम मिळत नाही.

4. संबंधित लक्षणं

मेंदूतील ट्युमर कुठे आहे यावर इतर लक्षणं अवलंबून असतात. जेव्हा ट्युमर मोठा होतो आणि मेंदूच्या आजूबाजूच्या भागांवर दाब टाकतो, तेव्हा मेंदूमध्ये दबाव वाढतो आणि त्यातून डोकेदुखी सुरू होते.

Symptoms of Brain Tumor
TEA चा फुलफॉर्म काय? चहा प्रेमींसाठी खास प्रश्न

इतर लक्षणांमध्ये यांचा समावेश होऊ शकतो. पुढे त्याची यादी आहे.

१ मळमळ आणि उलटी

२ झटके येणे (seizures)

३ दिसण्यात अडचण

४ हातपाय कमकुवत होणे

५ बोलताना अडचण येणे

६ शुद्ध हरपण

ही लक्षणं ट्युमरमुळे मेंदूवर झालेल्या दाबामुळे आणि बिघाडामुळे दिसू शकतात. त्यामुळे वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. सगळे मेंदूचे ट्युमर धोकादायक किंवा आक्रमक असतात असं नाही. या ट्युमरचे दोन मुख्य प्रकार असतात. एक म्हणजे साधा (Benign) आणि दुसरा म्हणजे कॅन्सरस (Malignant). या दोन्ही प्रकारांमध्ये फरक खूप मोठा असतो, आणि त्यामुळे उपचाराचं नियोजनही बदलतं. बर्‍याच वेळा अशा ट्युमरच्या उपचारासाठी सर्जरी, रेडिएशन आणि केमोथेरपी यांचा एकत्रित वापर करावा लागतो. पण जर निदान उशिरा झालं, तर ट्युमर मेंदूमधील महत्त्वाचे भाग नुकसान करू शकतो आणि हे नुकसान कायमचं असू शकतं. यामुळे रुग्णाला अर्धांगवायू, बोलण्यास अडचण, अंधत्व अशा कायमस्वरूपी विकृती होऊ शकतात. म्हणूनच मेंदूतील ट्युमरचं लवकरात लवकर निदान होणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेत लक्ष दिल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते आणि रुग्णाचं आयुष्य वाचू शकतं.

Symptoms of Brain Tumor
Piles Remedies : मूळव्याधावर घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

रुग्ण म्हणून तुम्ही काय करायला हवं?

डोकेदुखी किंवा इतर लक्षणं वारंवार जाणवत असतील, तर ती दुर्लक्ष करू नका. बाजारात मिळणारी सामान्य औषधं (पेनकिलर्स) तात्पुरता आराम देऊ शकतात, पण जर डोकेदुखी परत परत होत असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकतर्फी निष्कर्ष काढण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्या, जे तुम्हाला अधिक वैज्ञानिक व नेमका सल्ला देऊ शकतात.

जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी खास संदेश

बहुतेक वेळा तुम्हीच कोणत्याही गंभीर आजाराविरोधातली पहिली संरक्षणरेषा असता.साधा सीटी स्कॅन अनेकदा पुरेशी माहिती देत नाही. तसंच, एमआरआयवर काही असामान्य मेंदूतील गाठी किंवा रंग दाखवणाऱ्या गाठी (contrast-enhancing lesion) आढळल्यास, ती थेट मेंदूतील क्षयरोगाची गाठ (ट्युबरकुलोमा) किंवा परजीवींचा संसर्ग (न्यूरोसिस्टिसर्कोसिस) समजून त्यावर फक्त क्षयरोगविरोधी (Anti-Koch) किंवा कृमिनाशक (Anti-Helminthic) औषधं देऊन अंदाजाने उपचार सुरू करू नयेत. अशा परिस्थितीत, एखाद्या मेंदूच्या शस्त्रक्रियेतील तज्ज्ञ (न्यूरोसर्जन) किंवा कर्करोग तज्ज्ञाचा (ऑन्कोलॉजिस्ट) दुसरा सल्ला घेण्यात काहीही हरकत नाही उलट ते अधिक उपयुक्त ठरू शकतं.

Symptoms of Brain Tumor
Corn Bhaji Recipe : पावसात कुरकुरीत खायची ईच्छा होतेय? मग कॉर्न भज्यांची रेसिपी होईन जाऊद्यात

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com