Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात आपल्याला गरमा गरम खाण्याची प्रचंड ईच्छा होते.
पुढे आपण कमीत कमी वेळात आणि सोप्या पद्धतीत कॉर्न भजी कसे बनवायचे? हे जाणून घेणार आहोत.
उकडलेले कॉर्न, लसूण, मिरची आल्याची पेस्ट, तांदळाचे पीठ, बारिक कांदा, कढीपत्ता, तेल, मीठ, हळद, लाल तिखट, बेसन, कोथिंबीर, खायचा सोडा इ.
मिक्समध्ये हिरवी मिर्ची, आलं, लसूण बारिक पेस्ट तयार करा.
पुढे मिक्सरच्या भांड्यात मका फोडून घ्या. त्याची प्युरी करू नका.
आता एका भांड्यात मक्याचे दाणे घ्या. त्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात घ्या.
पुढे कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, हळद, लाल तिखट आणि शेवटी खायचा सोडा घाला.
आता हे पीठ पाण्याने घट्टसर तयार करून घ्या.
कढई गरम करून घ्या. मग त्यामध्ये हाताने भजी तळायला सुरुवात करा.
मग फुटणार नाही याची काळजी घ्या. अन् गरमा गरम मका भजी सर्व्ह करा.