Sakshi Sunil Jadhav
मूळव्याधाच्या समस्येने अनेक जण त्रस्त झालेले असतात.
मूळव्याधामूळे शौचास बसल्यावर रक्त येते.
गुदद्वाराजवळ एक गाठ येते. वेदना होतात.
पुढे आपण मूळव्याधावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
मुळव्याध्याच्या जागी कापसाने खोबरेल तेल लावा. त्याने जळजळ कमी होईल आणि थंडावा मिळेल.
कोरफडीत अॅंटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यानेसुद्धा त्वरित थंडावा मिळतो.
बर्फाचा शेक घ्या. १० मिनिटे शेक घेतल्याने तुम्हाला फरक जाणवेल.
हर्बल टी आणि केळींचे सेवन करा. त्याने गुदद्वाराला आलेली सूज आणि रक्त पडणे कमी होते.
खूप पाणा प्या आणि आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.