Brain tumor symptoms: डोळ्यांना सतत धुरकट दिसतंय? चष्म्याची गरज समजून दुर्लक्ष करू नका, हे ब्रेन ट्युमरचं पहिलं गंभीर लक्षण असू शकतं

डोळ्यांना धूसर दिसणे हे केवळ चष्म्याचे कारण नसून ब्रेन ट्यूमरचेही सुरुवातीचे लक्षण असू शकते. पिट्यूटरी अॅडेनोमा, मेनिन्जिओमा आणि इतर ट्यूमरची महत्त्वाची लक्षणे, कारणे आणि डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या.
Brain Tumor Causes Symptoms
Brain Tumor Saam TV
Published On

डोळ्यांना धुरकट दिसत असेल तर ही समस्या हलक्यात घेऊ नका. ही समस्या असू शकते एका गंभीर आजाराची लक्षणं, धुरकट दिसायला लागलं की आपल्याला बहुतेकवेळा वाटतं आपल्याला चष्मा लागला आहे. त्यामुळे आपण चष्म्याच्या मागे धावतो किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. पण या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने ब्रेन ट्युमर सारख्या एका मोठ्या आजाराला तोंड द्यावे लागू शकते.

डॉक्टरांच्या मते, आपले डोळे हे प्रत्यक्षात मेंदूचाच एक भाग मानले जातात. आपण एखादी गोष्ट पाहतो तेव्हा तिची माहिती डोळ्यांमधून ऑप्टिक नर्व्हद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते. त्यानंतर ही माहिती मेंदूतील विविध भागांमधून जात शेवटी त्या भागापर्यंत पोहोचते जो आपण पाहिलेल्या गोष्टी ओळखण्याचं आणि समजून घेण्याचं काम करतो.

या संपूर्ण मार्गात कुठेही ट्यूमर तयार झाला, मेंदूवर दबाव वाढला किंवा मज्जातंतूमध्ये काही बिघाड झाला तर त्याचे पहिले संकेत अनेकदा डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या बदलांमधून मिळू शकतात. त्यामुळेच डॉक्टर वारंवार सांगतात की, डोळे आणि मेंदू यांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे.

Brain Tumor Causes Symptoms
Oral Cancer: फक्त दोन मिनिटांत करा ही सोपी तोंडाची तपासणी, लगेच समजतील कॅन्सरची लक्षणं

ब्रेन ट्यूमरचे कोणते दोन प्रकार आहेत?

काही विशिष्ट प्रकारचे ब्रेन ट्यूमर सुरुवातीला डोळ्यांशी संबंधित समस्यांमुळेच लक्षात येतात. त्यापैकी पिट्यूटरी अॅडेनोमा हा एक प्रकार आहे. हा बहुतेक वेळा कॅन्सर नसलेला ट्यूमर असून तो पिट्यूटरी ग्रंथीजवळ तयार होतो. हा ट्यूमर हळूहळू दृष्टी कमी करू लागतो. सुरुवातीला याची ठळक लक्षणे दिसत नसल्यामुळे तो अनेकदा शांतपणे वाढत राहतो.

Brain Tumor Causes Symptoms
Cancer tumor growth: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होत असताना ही ५ मोठी लक्षणं पायांमध्ये दिसतात

दुसरा प्रकार म्हणजे क्रेनिओफॅरिंजिओमा. हा ट्यूमर लहान मुलांमध्ये तसंच प्रौढांमध्येही होऊ शकतो. तोही पिट्यूटरी ग्रंथीजवळ तयार होतो. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच शरीरातील हार्मोन्सच्या कार्यातही बिघाड होण्याची शक्यता असते.

तिसरा प्रकार म्हणजे मेनिन्जिओमा. हा ट्यूमर जर डोळ्यापासून मेंदूपर्यंत जाणाऱ्या ऑप्टिक नर्व्हजवळ किंवा पिट्यूटरी ग्रंथीच्या आसपास वाढला तर तो दृष्टीच्या मार्गावर दबाव आणू शकतो. त्यामुळे दृष्टी धूसर होणं किंवा बाजूचं दिसणं कमी होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

Brain Tumor Causes Symptoms
Early cancer signs: तुमच्या शरीरातही दिसतायत का हे ५ बदल? कॅन्सरची सुरुवात याच लक्षणांनी होते, तज्ज्ञांचा इशारा

चौथा प्रकार म्हणजे ऑप्टिक पाथवे ग्लायोमा. हा ट्यूमर डोळ्यांकडून मेंदूकडे संदेश पोहोचवणाऱ्या मार्गावर थेट परिणाम करतो. त्यामुळे कालांतराने हळूहळू दृष्टी कमी होत जाते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com