Early cancer signs: तुमच्या शरीरातही दिसतायत का हे ५ बदल? कॅन्सरची सुरुवात याच लक्षणांनी होते, तज्ज्ञांचा इशारा

Cancer warning signs: कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असते. शौच किंवा लघवीच्या सवयीतील बदल, जखम न भरून येणे, रक्तस्राव किंवा नवीन गाठ यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
Early cancer signs
Early cancer signssaam tv
Published On

भारतामध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. राष्ट्रीय कॅन्सर प्रतिबंध आणि संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, देशात दरवर्षी सुमारे 14 ते 16 लाख नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळतात. रक्ताचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर यांसारखे प्रकार सर्वाधिक आढळतात. याशिवाय पोटाशी संबंधित कॅन्सरचं प्रमाणही वाढतंय. यामागे चुकीचा आहार, फास्ट फूडचं वाढतं सेवन, चुकीची जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणं मानली जातात.

विशेष म्हणजे, कॅन्सर होण्यापूर्वी किंवा सुरुवातीच्या टप्प्यात शरीर अनेक संकेत देत असतो. मात्र ही लक्षणं सामान्य वाटल्यामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार लक्षात येईपर्यंत तो गंभीर अवस्थेत पोहोचलेला असू शकतो.

Early cancer signs
High cholesterol: ही ६ ड्रिंक्स रक्तवाहिन्यांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढतील बाहेर

सामान्य वाटणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका

कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं अनेकदा अगदी साधी वाटतात. काहींना गॅसचा त्रास होत असेल, काहींना संसर्ग झाला असेल किंवा सर्दी-खोकला असेल असं समजून लोक उपचार पुढे ढकलतात. पण हीच लक्षणं बराच काळ कायम राहिली तर ती कॅन्सरचीही सुरुवात असू शकते. त्यामुळे शरीरात वारंवार होणारे बदल हलक्यात घेऊ नका. या सवयी कोणत्या आहेत ते पाहूयात.

शौच किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल

जर बराच काळ बद्धकोष्ठता, वारंवार जुलाब होणं, लघवी वारंवार लागणं हे बदल जाणवत असतील तर त्यामागे केवळ आहार कारणीभूत असेलच असं नाही. काही वेळा ही लक्षणं आतड्यांचा किंवा किडनीच्या संबंधित कॅन्सरचीही असू शकतात.

जखम लवकर बरी होत नसेल

त्वचेवर झालेली जखम, तोंडातील फोड किंवा कोणताही घाव अनेक दिवस होऊनही भरून येत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही प्रकरणांमध्ये हे त्वचेच्या किंवा तोंडाच्या कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

Early cancer signs
Bad cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठलीये? हे 6 डिंक्स खेचून बाहेर काढतील वाईट कोलेस्ट्रॉल

शरीरातून असामान्य रक्तस्राव होणं

खोकताना रक्त येणं, शौचामध्ये रक्त दिसणं किंवा महिलांमध्ये नेहमीपेक्षा वेगळा रक्तस्राव होणं ही गंभीर बाब असू शकते. अशी कोणतीही समस्या दिसल्यास उशीर न करता डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

शरीरात नवीन गाठ किंवा सूज जाणवणं

स्तन, अंडकोष, मान किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात नवीन गाठ, सूज जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॅन्सरच्या सुरुवातीच्या गाठींमध्ये अनेकदा वेदना नसतात. त्यामुळे दुखत नाही म्हणजे धोका नाही, असा समज करून घेणं चुकीचं ठरू शकतं.

Early cancer signs
Artery plaque: कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये साचलेली चरबी कमी करायचीये? डॉक्टरांनी सांगितले 6 सोपे उपाय

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com