Cancer tumor growth: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होत असताना ही ५ मोठी लक्षणं पायांमध्ये दिसतात

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरची गाठ कशी तयार होते?

शरीरातील पेशी साधारणपणे नियंत्रित पद्धतीने वाढतात आणि मरतात. पण काही कारणांमुळे या पेशींचं DNA खराब होतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. अशा पेशी एकत्र जमा होऊन हळूहळू गाठ तयार करतात.

uncontrolled cell growth | saam tv

कॅन्सरची गाठ किती धोकादायक?

कॅन्सरची गाठ सौम्य नसून ती शरीरात पसरू शकते. काही गाठी रक्तप्रवाह किंवा इतर अवयवांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे वेळेवर उपचार न झाल्यास ती जीवघेणी ठरू शकते. शरीरात ही गाठ तयार होत असताना पायांमध्ये कोणती लक्षणं दिसतात ते पाहूया.

numbness in legs | saam tv

पायांमध्ये सतत सूज येणं

पायांमध्ये सतत सूज राहणं हे एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. ही सूज कधी कधी वेदना न देता वाढत जाते. शरीरात द्रव साठल्यामुळे किंवा रक्तप्रवाहावर परिणाम झाल्यामुळे असे होऊ शकते.

slow wound healing | saam tv

पायांमध्ये सतत वेदना

काही वेळा पायांमध्ये सतत दुखणं किंवा जडपणा जाणवू शकतो. ही वेदना विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही. कॅन्सर पेशी जवळच्या नसांवर दाब देत असल्यास अशी वेदना होऊ शकते.

cancer warning signs | saam tv

पायांमध्ये सुन्नपणा येणं

पायांमध्ये वारंवार मुंग्या येणं किंवा सुन्नपणा जाणवू शकतो. हे नसांवर परिणाम झाल्यामुळे होऊ शकते. काही वेळा चालताना अस्थिरता जाणवते. असं लक्षण सतत दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

nerve damage symptoms | saam tv

पायांमध्ये त्वचेचा रंग बदलणं

पायांच्या त्वचेचा रंग फिकट किंवा गडद होणं हेही लक्षण असू शकतं. रक्तप्रवाह योग्य न झाल्यास असा बदल दिसतो. काही वेळा त्वचा थंड किंवा कोरडीही वाटते. हे बदल दीर्घकाळ राहिल्यास तपासणी गरजेची असते.

chronic pain | saam tv

पायांमध्ये जखमा लवकर न भरून येणं

पायांवरील लहान जखमा किंवा खरचटणं लवकर बरं न होणं हेही लक्षण असू शकते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास असे दिसते. कॅन्सर किंवा इतर गंभीर आजारांमध्ये healing process मंदावते.

cancer detection | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

early heart attack signs | saam tv
येथे क्लिक करा