

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. लोक कामासाठी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात. मग त्यांच्या झोपेच्या वेळा बदलतात. लोक उशीरा उठतात मग उशीरा नाश्ता करतात, किंवा तो टाळून दुपारचं जेवण करतात. यासगळ्यामुळे तुमच्या मेंदू, ह्रदय, पचनसंस्था, लिव्हर, किडनी सगळ्यावर मोठा परिणाम होतो.
जेव्हा तुमच्या शरीरातल्या महत्वाच्या अवयवांवर परिणाम होतो तेव्हा तुम्हाला हार्ट अटॅकच्या धोक्याला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. कारण हार्ट अटॅकची लक्षणं ही सुरुवातीच्या टप्प्यात जाणवत नाहीत. तज्ज्ञांच्या मते यामागचं कारण म्हणजे Hypertension आहे. ते कसं आणि आपण कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने या समस्येला सामोरं जावं लागू शकतं जाणून घेऊयात. त्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
Hypertension ला आपण ‘सायलेंट किलर’ म्हणू शकतो. कारण याची लक्षणं कधीच ठळक दिसत नाहीत. याने हळूहळू शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. दिल्लीतील BLK‑Max Super Specialty Hospital येथील तज्ज्ञ Dr. T. S. Kler यांच्या मते, हाय ब्लड प्रेशरची सुरुवातीची कोणतीही ठळक लक्षणं नसतात. ताप, खोकला किंवा डायबेटीज सारखी स्पष्ट लक्षणं यात दिसत नाहीत. त्यामुळे बरीच लोकं वर्षानुवर्षे सामान्य जीवन जगत असतात आणि त्यांना हा आजार आहे हे कळतही नाही.
एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारतात अनेक लोक नियमितपणे रक्तदाब तपासत नाहीत. रक्तदाब मोजण्याची प्रक्रिया सोपी, फास्ट आणि कमी खर्चिक असली तरी लोक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना उशीरा या समस्येबद्दल कळतं.
तज्ज्ञांच्या मते, बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढत आहे. जास्त मीठ, तेलकट आणि प्रोसेस्ड अन्न, बसून राहण्याची सवय, वाढलेलं वजन, ताणतणाव, अपुरी झोप तसेच धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयी उच्च रक्तदाबासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. सुरुवातीला शरीरात कोणताही त्रास जाणवत नसल्यामुळे लोक जीवनशैलीत बदल करण्यासही उशीर करतात. त्यामुळे योग्य वेळेत जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी.
टीप: ही माहिती केवळ आरोग्य जागरूकतेसाठी देण्यात आलेली आहे. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.