Wonder Seeds For Health : आपल्या रोजच्या जीवनशैलीचा हार्मोन्सवर चांगला व वाईट परिणाम होत असतो. कोणत्या वेळी झोपावे, काय खावे, किती वेळ कोणत्या गोष्टींवर आपल्या वेळ खर्च करावा याचे संकेत आपल्याला वेळोवेळी मिळत असतात त्याचे कारण आपले सतत बदलणारे हार्मोन्स.
हार्मोन्स शरीरातील काही रासायनिक घटक असतात, त्याचे मुख्य कार्य म्हणजे शारीरिक विकासाची प्रक्रिया सुलभ होते. पेशी व शरीराच्या इतर भागांमध्ये संप्रेषणाचे मुख्य माध्यम हार्मोन्स आहेत.
मासिक पाळी नियंत्रित करण्यापासून ते भूक नियंत्रणात आणण्यासाठी हार्मोन्स जबाबदार असतात. त्याच वेळी, आजकालच्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे, पोषक तत्वांची कमतरता असलेल्या आहारामुळे इतर आरोग्य समस्यांव्यतिरिक्त आपल्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. हार्मोनल आरोग्याची (Health) स्थिती सुधारण्यासाठी कोणता आहार घ्यावा हे जाणून घेऊया.
१. सूर्यफुलाच्या बियांमध्ये जीवनसत्त्व (Vitamins) ई आणि सेलेनियमचा चांगला स्रोत आहेत आणि यामुळे प्रोजेस्टेरॉन वाढवतात. तुम्ही बिया भिजवून फळांसोबत खाऊ शकता किंवा बिया स्मूदी आणि दह्यामध्ये घालू शकता.
२. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा ३, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. भोपळ्याच्या बिया सॅलड आणि स्मूदीमध्ये जोडल्या जाऊ शकतात. याशिवाय तुम्ही या बियांचे सेवन फळांसोबत किंवा बटरमध्ये मिसळून करू शकता.
३. चिया बियांमध्ये ओमेगा ३, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. चिया बिया मासिक पाळीपूर्वीची लक्षणे कमी करण्यासाठी ओळखली जातात. बिया किमान दोन तास भिजवून ठेवा, मग तुम्ही त्यांना स्मूदी, दही किंवा फळांसोबत खाऊ शकता, असे ती सुचवते.
४. अंबाडीच्या बिया ओमेगा ३ आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. ते प्रजनन क्षमता वाढवण्यास आणि इस्ट्रोजेन उत्पादनास मदत करतात. तुम्ही दही, सॅलड, स्मूदी आणि ताक यामध्ये भाजलेले फ्लॅक्ससीड्स खाऊ शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.