Diabetes : शुगर फ्री पदार्थांचे सेवन करताय ? त्यातील साखरेचे प्रमाण माहितेय का ? याच्या अधिक सेवनाने आरोग्य बिघडू शकते का ?

साखर टाळणे म्हणजेच गोड पदार्थ खाणे हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे.
Diabetes, Sugar Free Products
Diabetes, Sugar Free ProductsSaam Tv
Published On

Diabetes : बदलत्या जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अधिकतर तरुणांमध्ये मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण आढळत आहे. हा आजार साधारणत: अनुवांशिक असतो तर, काही अंशी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होतो.

हा आजार (Disease) नियंत्रित करण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास होतो. साखर टाळणे म्हणजेच गोड पदार्थ खाणे हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत शुगर फ्रीचा वापर केल्यास मदत होते, असे म्हटले जाते.

Diabetes, Sugar Free Products
Jamun Leaves For Diabetes : मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभळाच्या पानांचा होतो उपयोग, साखरेचे वाढलेले प्रमाण असे करा कमी !

लोक शुगर फ्री बद्दल विचार करतात की ते पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवेल. परंतु, त्याचे स्वतःचे अनेक धोके देखील आहेत, जसे की त्याचे जास्त सेवन केल्यास उच्च रक्तदाबासह हृदयाचा धोका वाढू शकतो.

मिठाईच्या जागी शुगर फ्रीचा वापर मधुमेहाच्या रुग्णांसाठी सामान्य आहे. पण शुगर फ्रीचा अतिवापर तुम्हाला अडचणीत आणू शकतो. अनेकदा शुगर फ्रीच्या लेबलमध्ये सुक्रोज, रेबियाना या सर्व पदार्थांचा उल्लेख असतो. जे शुगर फ्रीमध्ये असलेले आर्टिफिशियल स्वीटनर्स हेल्दी म्हणून पचवत असतात, त्यांच्यासाठी हे धोक्याचे ठरू शकते.

Diabetes, Sugar Free Products
Diabetes control tips : रक्तातातील साखर नियंत्रणात ठेवायची आहे तर, मधुमेहाच्या रुग्णांनी जेवल्यानंतर करा 'हे' काम

जाणून घ्या शुगर फ्रीचे तोटे

१. हेल्थलाइनच्या मते, शुगर फ्रीचा जास्त वापर केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

२. शुगर फ्रीचा दीर्घकाळ वापर केल्यास कर्करोग होण्याची शक्यता वाढते, असे तज्ज्ञ सांगतात

३. शुगर फ्रीमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. शुगर फ्रीच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी, सांधेदुखी आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.

४. शुगर फ्रीमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तुमची गोड चव तृप्त होईल आणि मधुमेहही नियंत्रणात राहील, असा विचार करून तुम्ही शुगर फ्री गोळ्या खात असाल तर तुमची चूक आहे.

५. गोडाच्या लालसेवर मात करण्यासाठी हा उपाय असू शकतो, पण साखरेचा पर्याय म्हणून त्याचा वापर किती करायचा, हे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ठरवावे. असं असलं तरी, मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आजाराचा आणि स्थितीचा आधार घेऊनच त्याचे सेवन करावे, जे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शक्य आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com