

नेपाळमध्ये पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर सोशल मीडियावर बाबा वेंगाच्या नावाने सांगितल्या जाणाऱ्या २०२६ वर्षाच्या भविष्यवाण्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती, तिसरे महायुद्ध, एलियनचे आगमन, AIचा वाढता प्रभाव, जागतिक आर्थिक संकट आणि रशियातील सत्ताबदल अशा अनेक दाव्यांचा यामध्ये समावेश आहे.
सोशल मीडिया पोस्ट आणि काही माध्यमातल्या रिपोर्टनुसार, २०२६ मध्ये जगाच्या विविध भागांमध्ये मोठ्या नैसर्गिक आपत्ती घडू शकतात, असा दावा केला जातोय. भूकंप, पूर, वादळ आणि ज्वालामुखी सारख्या घटनांचा उल्लेखही केला जातो. पण एखादी घटना घडल्यानंतर तिची सांगड जुन्या भविष्यवाणीसोबत घालणे म्हणजे ती भविष्यवाणी अचूक होती, असा पुरावा होत नाही.
याशिवाय २०२६ मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होण्याचा दावाही सोशल मीडियावर व्हायरल आहे. रशिया-पाश्चिमात्य देशांमधील तणाव, चीन-तैवान प्रश्न आणि मध्य पूर्वेतील संघर्ष यांचा त्याच्याशी संबंध जोडला जात आहे. मात्र, युद्धाची निश्चित तारीख किंवा भविष्यातील घटना अशा प्रकारे अचूकपणे सांगता येत नाही.
नोव्हेंबर २०२६ मध्ये पृथ्वीच्या जवळ मोठे अंतराळयान येऊन एलियनशी संपर्क होऊ शकतो, असाही दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याला सध्या कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. AI माणसांच्या नियंत्रणाबाहेर जाईल आणि जागतिक आर्थिक संकट निर्माण होईल, असे दावेही याच यादीत आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सत्तेबाबतही २०२६ मध्ये मोठा बदल होण्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्याचीही ठोस पुष्टी झालेली नाही.
डिस्क्लेमर: या बातमीत बाबा वेंगांच्या नावाने सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या दाव्यांचा आढावा घेण्यात आला आहे. या दाव्यांना साम टिव्हीला कोणतीही वैज्ञानिक किंवा अधिकृत पुष्टी असल्याचे गृहीत धरू नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.