Weight loss: वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, Weight Loss करत असाल तर या ४ चुका टाळा

Weight management: वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं किंवा अति व्यायाम करणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. तज्ज्ञांनी सांगितलेल्या योग्य वजन कमी करण्याच्या सवयी आणि टाळायच्या चुका जाणून घ्या.
Weight loss
Weight losssaam t
Published On

वजन वाढणं ही आजकाल जवळपास प्रत्येकाची एक समस्या आहे. वाढलेल्या वजनामुळे विविध प्रकारचे आजारही उद्भवतात. अगदी लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत, सर्व वयोगटातील लोकांना स्थूलतेचा त्रास असल्याचं पाहायला मिळतं.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, चुकीची जीवनशैली, बैठी कामं, जंक फूड खाण्याची सवय आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लोक मोठ्या संकटात सापडलेत. अशा परिस्थितीत, काही लोक वजन कमी करण्यासाठी खाणंच सोडून देतात. इतकंच नाही तर काही जण तासनतास व्यायाम करतात. पण याचा खरंच काही फायदा होतो का? हे आज आपण जाणून घेऊया.

तज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने वजन कमी करणं म्हणजे केवळ कमी खाणं नाही तर संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि चांगल्या सवयींचा अवलंब करणं असतो. वजन कमी करताना आपल्याकडून काही ना काही चुका होत असतात. या चुका नेमक्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात.

Weight loss
High BP symptoms: सकाळी डोक्याच्या मागे दुखतंय? हाय ब्लड प्रेशरची ही सुरुवातीची धोकादायक लक्षणं वेळीच ओळखा

वजन कमी करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?

अभ्यासातून असं दिसून आलंय की, अचानक कमी जेवल्यामुळे तुमची चयापचय क्रिया मंदावते. यामुळे तुमचं वजन वेगाने वाढू लागतं. अति व्यायामामुळे थकवा आणि दुखापतही होऊ शकते.

अचानक खाणं बंद करणं योग्य नाही

अनेकदा लोकांना वाटतं की जेवण टाळल्याने वजन लवकर कमी होईल. पण प्रत्यक्षात ही पद्धत शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

क्रॅश डायटिंगमध्ये लोक गरजेपेक्षा खूप कमी कॅलरीज घेतात, ज्यामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते .

तज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही कमी प्रमाणात खाता तेव्हा शरीर उपासमारीच्या अवस्थेत जातं आणि चयापचय क्रिया मंदावते.

जे लोक अचानक आपले अन्नसेवन कमी करतात, त्यांच्यामध्ये अशक्तपणा, चक्कर येणं, केस गळणं यांसारख्या समस्या वाढतात.

अतिप्रमाणातील व्यायाम धोकादायक

डॉक्टरांच्या मतानुसार, वजन कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक असला तरी, आहार आणि जीवनशैली देखील तितकीच महत्त्वाची आहे. जास्त प्रमाणात हानिकारक ठरू शकतो. अति प्रमाणात व्यायाम केल्यास तुमच्या स्नायूंना इजा, थकवा येणं आणि शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते. यामुळे तणाव आणि फॅट्स शरीरात जमा होऊ लागतात.

Weight loss
High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

या गोष्टींकडे लक्ष द्या

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लोक अनेकदा आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि प्रोटीनची कमतरता ही एक मोठी समस्या बनते. प्रोटीन शरीरातील स्नायूंचं प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत करतात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात कडधान्यं, चीज, अंडी, दही आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

Weight loss
High blood pressure: तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय उच्च रक्तदाब, डॉक्टरांनी दिला धोकादायक ‘सायलेंट किलर’चा इशारा

वजन कमी करण्यासाठी चांगली झोप घेणं आणि तणावावर नियंत्रण ठेवणं देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीराला पुरेशी झोप मिळत नाही. तेव्हा भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. यामुळे भूक वाढू शकते आणि कॅलरीचं सेवनही वाढू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com