High BP symptoms: सकाळी डोक्याच्या मागे दुखतंय? हाय ब्लड प्रेशरची ही सुरुवातीची धोकादायक लक्षणं वेळीच ओळखा

Hypertension Symptoms: उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. डोकेदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास आणि दृष्टी धूसर होणे यांसारख्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.
High BP symptoms
High BP symptomssaam tv
Published On

दररोजचं काम, तणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. ज्यामध्ये सर्वात धोकादायक आजार म्हणजे उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लड प्रेशर. अनेकांना हा आजार आहे हेच माहीत नसतं. अचानक हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आल्यानंतरच लोकांना त्याचं निदान होतं.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात सुमारे 1.28 अब्ज लोक हाय ब्लड प्रेशरने त्रस्त आहेत. हाय ब्लड प्रेशर हे हार्ट अटॅकचं सर्वात मोठं कारण मानलं जातं. दरवर्षी जवळपास 1 कोटी मृत्यू याच कारणामुळे होतात. जागतिक आजारांच्या एकूण भारामध्ये सुमारे 7 टक्के हिस्सा हाय ब्लड प्रेशरचा आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा आजार वेळेवर ओळखला तर पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो. औषधं, नियमित व्यायाम, मीठ कमी खाणं आणि वजन कमी करणं यामुळे रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो. मात्र समस्या अशी की बहुतेक लोक तपासणीच करत नाहीत.

बंगळुरूच्या किम्स हॉस्पिटल्सचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी विभागाचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. पी. अशोक कुमार यांनी सांगितलं की, हाय ब्लड प्रेशर हा शांतपणे वाढणारा आजार आहे. अनेक वर्षे त्याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. अनेकांना वाटतं की, रक्तदाब वाढला तर लगेच त्रास जाणवेल, पण प्रत्यक्षात सुरुवातीची लक्षणं खूप छोटी असतात.

डोक्याच्या मागच्या बाजूला वेदना

सकाळी उठल्यानंतर डोक्याच्या मागच्या भागात डोकेदुखी जाणवत असेल तर ते हाय ब्लड प्रेशरचे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. दिवसभरात ही डोकेदुखी कमी होत असल्यामुळे अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात.

High BP symptoms
Diabetic Kidney Problems: मधुमेही रूग्णांमध्ये ही ३ प्रमुख लक्षणं दिसली तर व्हा सावध; किडनी निकामी होण्याचा धोका

सतत थकवा जाणवणं

सतत थकवा जाणवणं हेही महत्त्वाचे संकेतांपैकी एक आहे. रक्तदाब वाढल्यामुळे हृदयाला शरीरात रक्त पोहोचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे पुरेशी झोप घेतली तरी शरीर थकल्यासारखं वाटू शकतं. रोजची साधी कामंही अचानक कठीण वाटू लागल्यास रक्तदाब तपासून घेणं गरजेचं आहे.

श्वास घेण्यास त्रास होणं

दररोजची कामं करताना जर तुम्हाला श्वास घेताना त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. जिने चढताना, थोडं चालल्यावर किंवा घरकाम करतानाही धाप लागत असेल तर शरीरात काहीतरी बिघाड सुरू असल्याचा तो इशारा असू शकतो.

High BP symptoms
Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

नाकातून रक्त येणं

काही लोकांना कोणतंही कारण नसताना नाकातून रक्त येण्याचा त्रास होतो. वातावरण किंवा अॅलर्जीमुळे असं होऊ शकतं. मात्र जर हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

दृष्टीवर परिणाम

डोळ्यांवर परिणाम होणं हा देखील उच्च रक्तदाबाचं लक्षण असतं. रक्तदाब वाढल्यामुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्यांवर ताण येतो. त्यामुळे दृष्टी धूसर होणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं किंवा डोळ्यांभोवती दाब जाणवणं अशी लक्षणं दिसू शकतात.

High BP symptoms
High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

टीप : ही माहिती वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. कुठलाही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com