High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Exercises To Avoid With High Blood Pressure: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी कोणते व्यायाम टाळावेत हे जाणून घ्या. जड वजन उचलणे, HIIT आणि काही तीव्र व्यायामांमुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो आणि हृदयावर ताण येण्याचा धोका वाढतो.
High Blood Pressure
High Blood Pressuregoogle
Published On

उच्च रक्तदाब हा एक असा आजार आहे जो अनेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय शरीराला हानी पोहोचवतो. जोपर्यंत एखादी गंभीर समस्या उद्भवत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना आपला रक्तदाब जास्त आहे हे माहीतही नसतं. याच कारणामुळे याला 'सायलेंट किलर' म्हटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), जगभरातील सुमारे १.२८ अब्ज प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत आणि यापैकी जवळपास निम्म्या लोकांना आपल्या समस्येची जाणीवही नाही.

व्यायाम करू नये का?

लोकांना अनेकदा असं वाटतं की, उच्च रक्तदाब असलेल्यांनी व्यायाम करू नये. पण तज्ज्ञ या मताशी सहमत नाहीत. डॉ. विनय कुमार पांडे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, नियमित शारीरिक व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदय निरोगी राखण्यास मदत होते. काही प्रकारच्या व्यायामामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो.

High Blood Pressure
Liver problem symptoms: रात्री सतत पाठदुखी होतेय; लिव्हर खराब होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना आधीपासूनच हृदयाच्या समस्या आहेत त्यांनी जड वजन उचलणं टाळावं. वजन उचलल्याने तुमच्या क्षमतेच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वजन उचलल्याने, शरीरावर अचानक ताण येऊ शकतो.

कोणते व्यायाम करणं टाळावं?

डेडलिफ्ट, हेवी स्क्वॅट्स किंवा हाय-इंटेन्सिटी बेंच प्रेस यांसारख्या व्यायामांमुळे काही लोकांमध्ये चक्कर येणं, छातीत दाब जाणवणं आणि हृदयाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. अनेक लोक वजन उचलताना आपला श्वास रोखून धरतात ज्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो.

High Blood Pressure
Diabetic Kidney Problems: मधुमेही रूग्णांमध्ये ही ३ प्रमुख लक्षणं दिसली तर व्हा सावध; किडनी निकामी होण्याचा धोका

हाय-इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) सर्वांसाठी सुरक्षित मानलं जात नाही. डॉ. विनय स्पष्ट करतात की, जे फिटनेसची नुकतीच सुरुवात करतायत, ज्यांना उच्च रक्तदाब आहे किंवा जे मानसिक तणावाखाली आहेत त्यांनी या प्रकारचा व्यायाम सावधगिरीने करावे.

High Blood Pressure
Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

डॉक्टरांच्या मते, पुश-अप्स किंवा दोरीवरच्या उड्या यांसारख्या सतत जोर लावावा लागणाऱ्या व्यायामांचाही ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो. व्यायाम केल्यानंतर तुम्हाला जरासा जरी त्रास झाला तरी डॉक्टरांची मदत घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com