High blood pressure: तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय उच्च रक्तदाब, डॉक्टरांनी दिला धोकादायक ‘सायलेंट किलर’चा इशारा

Hypertension in youth: तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ताण, फास्ट फूड, अपुरी झोप आणि बैठी जीवनशैली यामुळे हृदय व किडनीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
high blood pressure awareness
high blood pressure awarenesssaam tv
Published On

आजपर्यंत उच्च रक्तदान म्हणजे फक्त वृद्धांमध्ये दिसणारा आजार अशी समजूत होती. मात्र आता परिस्थिती बदलत असून किशोरवयीन मुलं आणि वीस-पंचविशीतल्या तरुणांनाही मोठ्या प्रमाणात उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. ही चिंताजनक बाब असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

डॉ. निशा कृष्णमूर्ती यांनी सांगितलं की, भारतात तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण शांतपणे वाढतंय. अनेक तरुणांना स्वतःला ही समस्या आहे याची कल्पनाही नसते. त्यामुळेच उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ म्हटलं जातं.

आधुनिक जीवनशैली ठरतंय कारण

डॉक्टरांच्या मते, बदलती जीवनशैली ही यामागची मोठी कारणं आहेत. आजची तरुण पिढी मोबाईल, लॅपटॉप आणि इतर स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवते. रात्री उशिरापर्यंत जागरण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली यामुळे शरीरावर ताण वाढतो.

high blood pressure awareness
Summer Weakness: मेहनत न करताही उन्हाळ्यात का येतो अशक्तपणा? जाणून घ्या तुम्हाला येणाऱ्या थकव्याचं कारण

याशिवाय फास्ट फूड, जास्त मीठ असलेले पदार्थ, शुगर असलेले ड्रिंक्स आणि वेळेवर जेवण न करणं यामुळेही आरोग्यावर परिणाम होतोय. सततचा अभ्यासाचा ताण, करिअरची चिंता आणि सोशल मीडियाचा दबाव यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो.

लठ्ठपणामुळेही वाढतो धोका

या सर्व सवयींमुळे तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढतंय. लठ्ठपणा हा उच्च रक्तदाबासाठी मोठा धोका मानला जातो. त्यामुळे कमी वयातच हृदय आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

‘आम्ही अजून तरुण आहोत’ असं समजणं हीच मोठी चूक

अनेक तरुणांना वाटतं की, जीवनशैलीशी संबंधित आजार त्यांना होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते नियमित आरोग्य तपासणी आणि रक्तदाब तपासणे टाळतात. पण डॉक्टरांच्या मते, हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते.

high blood pressure awareness
Heart Attack In Kids: लहान मुलांमध्ये ही ५ लक्षणं दिसली व्हा सावध; हार्ट अटॅकचा असतो धोका

अनेक तरुण रुग्णांना रक्तदाब असल्याचे समजल्यावर धक्का बसतो, कारण हा आजार फक्त वयस्कर लोकांनाच होतो अशी त्यांची समज असते. मात्र आता परिस्थिती बदलली असून तरुणांनीही हृदयाच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम

डॉक्टरांनी सांगितल की, कमी वयात सुरू झालेला अनियंत्रित उच्च रक्तदाब पुढे जाऊन हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे नुकसान आणि इतर गंभीर आजारांचे कारण ठरू शकतो. त्यामुळे वेळेत तपासणी आणि जीवनशैलीत बदल करणे खूप महत्त्वाचे आहे.

high blood pressure awareness
Relationship advice: घरच्यांना गर्लफ्रेंडबद्दल सांगण्याची योग्य वेळ ओळखायची कशी? या गोष्टी नक्की जाणून घ्या

रक्तदाब नियंत्रणासाठी काय करावं?

तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. जास्त मीठ असलेले आणि पॅकेज्ड पदार्थ कमी खावेत. पुरेशी झोप घेणं, ताण कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम करणं, चालणं, छंद जोपासणं आणि स्क्रीन टाइम कमी ठेवणंही गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com