

ऑगस्ट २०२६ हा महिना धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात श्रावण महिन्याची सुरुवात होत असून भगवान शिवाच्या उपासनेसाठी हा काळ विशेष शुभ मानला जातो. तसेच नागपंचमी, हरियाली तीज, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि संकष्टी चतुर्थी यांसारखे अनेक प्रमुख सण याच महिन्यात साजरे केले जाणार आहेत.
महिन्याची सुरुवात २ ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीने होईल. त्यानंतर ९ ऑगस्टला कामिका एकादशी, ११ ऑगस्टला मासिक शिवरात्री आणि १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. १५ ऑगस्टला हरियाली तीज, स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट विनायक चतु्र्थी, १७ ऑगस्टला नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार, तर २३ ऑगस्टला श्रावण पुत्रदा एकादशी साजरी केली जाईल. याशिवाय २६ ऑगस्टला ओणम, २७ ऑगस्टला नारळी पौर्णिमा आणि २८ ऑगस्टला रक्षाबंधन हा भाऊ - बहिणींच्या प्रेमाचा सण साजरा केला जाईल. महिन्याचा शेवट १३ ऑगस्टला संकष्टी चतुर्थीने होणार आहे.
श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात अनेक भाविक उपवास, अभिषेक आणि शिवपूजा करतात. कामिका एकादशी आणि पवित्र एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. हरियाली तीजला विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात, तर अविवाहित मुली इच्छित वर मिळावा म्हणून उपवास करतात.
नागपंचमी हा श्रावणातील अत्यंत लोकप्रिय सण असून या दिवशी नागदेवतेची पूजा करून भगवान शिवाचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना केली जाते. नारळी पौर्णिमेला समुद्रपूजन आणि भगवान विष्णू-लक्ष्मीची आराधना केली जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात, तर भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो. धार्मिक श्रद्धा, उपवास, पूजा आणि कौटुंबिक सणांनी भरलेला ऑगस्ट २०२६ हा महिना भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार असून, संपूर्ण महिनाभर विविध व्रत- उत्सवांचा आनंद अनुभवता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.