

जर तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल , तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. २ ऑगस्ट २०२६ रोजी सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच आजही दोन्ही मौल्यवान धातू कालच्या दरानेच विकले जात आहेत.
काल २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ४०० ची वाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या असून कोणतीही वाढ किंवा घट नोंदवली गेलेली नाही.
२४ कॅरेट सोनं - १,४४,२२० प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट सोनं - १,३२,२०० प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट सोनं - १.०८.२०० प्रति १० ग्रॅम
वेगवेगळ्या शहरांमध्ये तसेच ज्वेलर्सनुसार या दरांमध्ये थोडाफार फरक असू शकतो.
आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ किलो चांदीचा भाव २,३५,००० इतकाच कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदीचे दर स्थिर आहेत.
सोनं आणि चांदीच्या किंमती अनेक कारणांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातले दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, आयात शुल्क, मागणी आणि पुरवठा, विविध देशांच्या केंद्रीय बँकांची धोरणे तसेच जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय घडामोडी यांचा थेट परिणाम दरांवर होतो.
सोनं खरेदी करताना फक्त सोन्याचा दर पाहू नका. मेकिंग चार्ज, जीएसटी आणि BIS हॉलमार्क यांची खात्री करूनच खरेदी करा. वेगवेगळ्या ज्वेलर्सचे मेकिंग चार्ज वेगळे असू शकतात. त्यामुळे दरांची तुलना करूनच निर्णय घेणं फायदेशीर ठरेल.
सध्या सोन्याच्या किमती स्थिर असल्या तरी जागतिक बाजारातल्या घडामोडींमुळे त्यात कधीही बदल होऊ शकतो. त्यामुळे लग्न, सण किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारभाव तपासून योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.