ITR Deadline 2026: ३१ जुलैची डेडलाइन चुकली? आता ITR भरताना 'हा' दंड बसणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Income Tax : ३१ जुलै २०२६ ची ITR भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. आता उशिरा रिटर्न भरल्याने ५,००० पर्यंत दंड, व्याज, रिफंडमध्ये उशीर आणि काही टॅक्स सवलती गमवण्याची शक्यता आहे.
ITR Deadline 2026
ITR Deadline 2026meta ai
Published On

३१ जुलै २०२६ ही आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता संपली आहे. नोकरी करणारे कर्मचारी, पेन्शनधारक, विद्यार्थी तसेच व्यवसायातून उत्पन्न नसलेल्या करदात्यांनी या तारखेपर्यंत ITR भरला नसेल, तर आता त्यांना बिलेटेड ITR दाखल करावा लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) यंदा ITR भरण्याची अंतिम तारीख वाढवलेली नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी अनेक करदात्यांनी केल्या होत्या. पोर्टल स्लो चालणे आणि एरर येण्याच्या समस्या समोर आल्या होत्या. त्यामुळे मुदत वाढेल, अशी अपेक्षा होती. पण तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर सरकारने अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही.

ITR Deadline 2026
DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 63% पर्यंत वाढण्याची शक्यता, पगार किती होणार?

उशिरा ITR भरल्याने काय होईल?

३१ जुलैनंतर ITR भरल्यावर तो बिलेटेड ITR म्हणून स्वीकारला जाईल. अशा परिस्थितीत करदात्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार ५००० पर्यंत Late Fee भरावी लागू शकते. तसेच टॅक्सची थकबाकी असल्यास त्यावर व्याजही लागू शकते.याशिवाय, टॅक्स परतावा ( Refund ) मिळायला उशीर होऊ शकतो आणि काही करसवलतींचा लाभही गमवावा लागू शकतो.

ITR Deadline 2026
Ladki Bahin Yojana : लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली! अंतिम यादी जाहीर; आता लाडकी बहीण योजनेचा ₹1,500 चा हप्ता कधी येणार?

सर्वांसाठी ३१ जुलै अंतिम तारीख नाही

३१ जुलैची अंतिम मुदत सर्व करदात्यांसाठी लागू होत नाही. ज्या व्यक्तींचे व्यवसायातून उत्पन्न आहे, पण त्यांना टॅक्स ऑडिटची आवश्यकता नाही, त्याच्यासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे. तर ज्या व्यावसायिक किंवा संस्थांसाठी टॅक्स ऑडिट अनिवार्य आहे. त्यांच्यासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तसेच ट्रान्सफर प्रायसिंग रिपोर्ट सादर करणाऱ्या करदात्यांना ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ITR दाखल करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com