Summer swelling problems: उन्हाळ्यात हात-पाय सुजतायत? डॉक्टरांनी दिला गंभीर आजारांचा धोक्याचा इशारा

Swollen hands and feet: उन्हाळ्यात हात, पाय आणि घोट्यांमध्ये सूज येण्याची समस्या वाढत आहे. शरीरातील पाण्याची कमतरता, जास्त उष्णता आणि रक्ताभिसरणातील बदल यामुळे हा त्रास होऊ शकतो. काही लक्षणं गंभीर आजारांचे संकेत असू शकतात, त्यामुळे योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
Summer swelling problems: उन्हाळ्यात हात-पाय सुजतायत? डॉक्टरांनी दिला गंभीर आजारांचा धोक्याचा इशारा
Published On

सध्याच्या दिवसांत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असतानाच अनेकांना आणखी एका त्रासाचा सामना करावा लागतोय. हात, पाय, बोटं किंवा घोट्यांमध्ये अचानक सूज येण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतायत. अनेकजण याकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहतात, मात्र काहीवेळा ही सूज गंभीर आजाराचे संकेतही ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

नवी दिल्लीतील शालीमार बागमधील फोर्टिस रुग्णालयाचे नेफ्रोलॉजी विभागातील सल्लागार डॉ. भानू मिश्रा यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलीये. त्यांच्या मते, उन्हाळ्यात शरीरातील तापमान वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो. त्यामुळे शरीरातील द्रव काही भागांमध्ये साचू लागतो आणि त्याचा परिणाम म्हणून हात, पाय, बोटं आणि घोट्यांमध्ये सूज दिसून येते.

Summer swelling problems: उन्हाळ्यात हात-पाय सुजतायत? डॉक्टरांनी दिला गंभीर आजारांचा धोक्याचा इशारा
Sugar free diet: फक्त चहातील साखर बंद करून उपयोग नाही, या सवयी वाढवत आहेत टाइप-२ डायबेटीसचा धोका

डॉ. मिश्रा यांनी सांगितलं की, ही समस्या विशेषतः जास्त वेळ एकाच ठिकाणी उभं राहणाऱ्या किंवा बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये अधिक दिसतं. शरीरात पाण्याची कमतरता असणं, आहारात मिठाचं प्रमाण जास्त असणं आणि शारीरिक हालचाली कमी असणं यामुळेही सूज वाढू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं.

सामान्यतः उष्णतेमुळे आलेली सूज काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर कमी होते. मात्र काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. जर सूज आलेल्या भागात वेदना होत असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा लालसर दिसत असेल किंवा स्पर्श केल्यावर गरम वाटत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Summer swelling problems: उन्हाळ्यात हात-पाय सुजतायत? डॉक्टरांनी दिला गंभीर आजारांचा धोक्याचा इशारा
Lack Of Sleep: फक्त सहा तासांची झोप घेत असाल तर शरीरात दिसतील हे ५ बदल

याशिवाय अचानक वजन वाढणं किंवा दोन्ही पायांऐवजी फक्त एका पायात जास्त सूज दिसणं हे देखील गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. डॉक्टरांच्या मते, अशा प्रकारची सूज हृदय, किडनी, लिव्हर किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित समस्येचं संकेत देऊ शकते.

या त्रासापासून बचाव करण्यासाठी काही साध्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. दिवसभर पुरेसं पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आहारात मिठाचं प्रमाण कमी ठेवावं आणि हलकं, संतुलित अन्न खावं. खूप वेळ एकाच स्थितीत बसून किंवा उभं राहण्याऐवजी मधूनमधून चालणं फायदेशीर ठरतं.

Summer swelling problems: उन्हाळ्यात हात-पाय सुजतायत? डॉक्टरांनी दिला गंभीर आजारांचा धोक्याचा इशारा
Work from home health risks: लॅपटॉपची उष्णता शरीरासाठी घातक? तज्ज्ञांनी दिला वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना महत्त्वाचा इशारा

तसंच नियमित हलका व्यायाम केल्याने शरीर एक्टिव्ह राहतं आणि रक्ताभिसरण सुधारतं. आराम करताना पायाखाली उशी ठेवून पाय थोडं उंचावर ठेवल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास हात-पाय सुजण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com