Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

Why are my elbows dark: कोपराची त्वचा काळी आणि जाड होण्यामागे धूळ, घर्षण किंवा उन्हासोबतच इन्सुलिन रेजिस्टन्स, डायबिटीज, थायरॉइड आणि PCOS सारखी कारणे असू शकतात. अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणजे काय आणि कोपर काळा पडल्यास नेमकं काय करावं, जाणून घ्या.
Dark elbows causes
Dark elbows causessaam tv
Published On

तुमच्या कोपराच्या आसपासची त्वचा काळी पडली आहे का? तिथे काळसर डाग दिसतायत? असे असेल तर त्याकडे केवळ सौंदर्याशी संबंधित समस्या म्हणून पाहू नका. अनेकदा आपण कोपरावर आलेले काळे डाग सहज दुर्लक्षित करतो. धूळ, मळ, उन्हामुळे त्वचा काळवंडणं किंवा सतत घास लागणं यामुळे असं झालं असावं, असं आपल्याला वाटते. त्यामुळे स्क्रब किंवा एखादी क्रीम वापरून हे डाग कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

पण प्रत्येक वेळी कोपर काळा पडण्यामागे हीच कारणं असतील असं नाही. काही वेळा त्वचेतील हा बदल शरीरात सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्येचा संकेतही असू शकतो.

Dark elbows causes
Bad cholesterol: फक्त 2 दिवस खा हा 1 ब्रेकफास्ट; खराब कोलेस्ट्रॉन निघून जाईल, हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

तज्ज्ञांच्या मते, कोपराची त्वचा सतत काळी आणि जाड होत असेल तर त्यामागे शरीरातील काही बदल कारणीभूत असू शकतात. वैद्यकीय भाषेत अशा प्रकारच्या त्वचेच्या बदलाला अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स (Acanthosis Nigricans) असं म्हणतात. हा एक आजार नसून काही आरोग्यविषयक समस्यांचा इशारा देणारी त्वचेची अवस्था असू शकते.

डायबिटीज

कोपराच्या त्वचेवर काळसरपणा येण्यामागे इन्सुलिन रेजिस्टन्स हे एक सामान्य कारण असू शकतं. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाहीत. ही समस्या पुढे जाऊन टाइप-२ डायबिटीजचा धोका वाढवू शकते. विशेष म्हणजे काही लोकांमध्ये रक्तातील साखर वाढल्याचे निदान होण्याआधीच त्वचेवर असे काळसर डाग दिसू लागतात.

थायरॉइडची समस्या

कोपर काळं पडण्यामागे फक्त डायबिटीज किंवा इन्सुलिन रेजिस्टन्सच कारणीभूत असतात असं नाही. थायरॉइडच्या समस्येमुळेही त्वचेत काही बदल होऊ शकतात. विशेषतः हायपोथायरॉइडिझम म्हणजेच थायरॉइड ग्रंथी शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी हार्मोन्स तयार करत असेल तर शरीराची चयापचयाची प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावतं. त्याचा परिणाम त्वचेवरही होऊ शकतो. त्वचा कोरडी, जाड आणि काही ठिकाणी असमान रंगाची दिसू शकते.

Dark elbows causes
High cholesterol: आहारात फक्त 'या' 3 पदार्थांचा करा समावेश; रक्तवाहिन्यांमध्ये जमा असलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल

महिलांमध्ये PCOS आणि हार्मोन्सचे असंतुलन

महिलांच्या बाबतीत कोपरावर दिसणाऱ्या काळसर, जाड डागांमागे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) हीदेखील एक शक्यता असू शकते. PCOS ही हार्मोन्सशी संबंधित समस्या आहे. या स्थितीत शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं. त्याचबरोबर इन्सुलिनची पातळीही वाढू शकते. परिणामी त्वचेवर काळसर आणि काही वेळा मखमलीसारखे दिसणारे जाड डाग तयार होऊ शकतात. अशा प्रकारचे डाग डायबिटीज किंवा इन्सुलिन रेजिस्टन्समध्येही दिसू शकतात.

कोपर काळं पडलं तर नेमकं काय करायचं?

कोपरावर काळसर डाग दिसले म्हणून लगेच घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक काळा डाग एखाद्या गंभीर आजारामुळेच होतो असं नाही. मात्र त्वचा सतत काळी आणि जाड होत असेल किंवा त्यासोबत शरीरात इतर बदलही जाणवत असतील तर केवळ स्क्रब किंवा क्रीम वापरून समस्या लपवण्यापेक्षा त्यामागचे कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.

Dark elbows causes
High Cholesterol Diet: नसांमध्ये साचलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल खेचून काढेल बाहेर; आहारात फक्त या 1 भाजीचा करा समावेश

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com