High Cholesterol Diet: नसांमध्ये साचलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल खेचून काढेल बाहेर; आहारात फक्त या 1 भाजीचा करा समावेश

Foods For High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे. दुधी भोपळ्यातील फायबर, कमी कॅलरी आणि कमी चरबी यामुळे तो संतुलित आहाराचा भाग ठरू शकतो. मात्र केवळ दुधीवर अवलंबून न राहता व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
High Cholesterol Diet
High Cholesterol Dietsaam tv
Published On

आजकाल बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आता खूप सामान्य झाली आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि ब्लड प्रेशरसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.

अशा परिस्थितीत आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी महाग पदार्थच किंवा डाएट घेतलं पाहिजे असं नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या रोजच्या आहारात सहज उपलब्ध असलेली दुधी म्हणजेच दुधी भोपळाही चांगला पर्याय ठरू शकतो.

आपल्यापैकी प्रत्येकाला दुधी आवडतो असं नाही. अनेकांना दुधीची चव आवडत नाही. त्यामुळे काहीजण दुधी खाणं टाळतात. मात्र ही साधी भाजी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

High Cholesterol Diet
Bad cholesterol treatment: साचलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल वितळणार आणि गोळ्यांपासूनही सुटका? LDL कमी करण्याची एका डोसची ही नवीन थेरपी जाणून घ्या

दुधी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास कशी मदत करते?

फायबरचा चांगला स्रोत

दुधीमध्ये फायबर असतं. त्यातील विरघळणारे फायबर म्हणजेच ‘सोल्युबल फायबर’ शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत करू शकतं. हे फायबर आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं शोषण होण्यापासून रोखण्यास मदत करतं. त्यामुळे नियमित आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून दुधीचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.

कॅलरी आणि चरबीचं प्रमाण

दुधीमध्ये कॅलरी खूप कमी असतात आणि चरबीचं प्रमाणही कमी असतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दुधीचा आहारात समावेश करता येतो. वजन वाढल्यास कोलेस्ट्रॉलची समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कमी कॅलरी आणि कमी चरबी असलेल्या भाज्या आहारात घेणं फायदेशीर ठरू शकतं.

पोटॅशियम आणि व्हिटॅमिन C

दुधीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन C यांसारखे पोषक घटक असतात. पोटॅशियम वाढलेलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतं. तर व्हिटॅमिन C शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठीही ते उपयुक्त ठरू शकतं.

टॉक्सिन घटक बाहेर टाकण्यास मदत

दुधी शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच अनावश्यक घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला मदत करू शकतं. याचा फायदा लिव्हर आणि हृदयाच्या आरोग्यालाही होऊ शकतो. निरोगी लिव्हर शरीरातील कोलेस्ट्रॉलचं मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.

High Cholesterol Diet
Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने वाढतोय; ऑफिसमध्ये काम करताना ‘या’ चुका करणं टाळा

दिवसातून किती दुधी खावा?

तज्ज्ञांच्या मते, दिवसाला साधारण 100 ते 200 ग्रॅम शिजवलेली दुधी आहारात घेणं आरोग्यासाठी योग्य आहे. दुधीची भाजी, सूप किंवा दुधीचा रस अशा वेगवेगळ्या प्रकारे तिचे सेवन करता येतं. मात्र दुधीचा रस घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रस नेहमी ताजा असावा. तसंच तो रिकाम्या पोटी घेणं टाळावं. काही लोकांना दुधीचा रस घेतल्यानंतर गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधी कडू तर नाही ना, हे तपासून घ्या. दुधी कडू लागत असल्यास तिचा रस पिऊ नये. दुधी आहारात समाविष्ट करणं फायदेशीर ठरू शकतं. मात्र केवळ दुधी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या पूर्णपणे दूर होईल असं नाही. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकेच महत्त्वाचं आहे.

High Cholesterol Diet
High blood pressure: हाय बीपीचा त्रास आहे? सकाळच्या नाश्त्यातून हे 3 पदार्थ काढून टाका, डॉक्टरांनी सांगितले हेल्दी ऑप्शन

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com