High blood pressure: हाय बीपीचा त्रास आहे? सकाळच्या नाश्त्यातून हे 3 पदार्थ काढून टाका, डॉक्टरांनी सांगितले हेल्दी ऑप्शन

High BP diet: हाय बीपीचा त्रास असल्यास सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ टाळावेत? जास्त मीठ, कॅफीन आणि चरबीयुक्त पदार्थांचा रक्तदाबावर होणारा परिणाम जाणून घ्या. ओट्स, पोहे, उपमा, इडली यांसारखे आरोग्यदायी पर्याय कोणते, हेही समजून घ्या.
High blood pressure
High blood pressuresaam tv
Published On

उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपीची समस्या दीर्घकाळ राहिल्यास त्याचा परिणाम हृदय आणि मेंदूच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी औषधांसोबतच त्यांच्या आहाराकडेही लक्ष देणं फार गरजेचं आहे. सकाळच्या नाश्त्यात आपण नेमकं काय खातो याचाही रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.

साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि एमबीबीएस एमडी डॉक्टर बिमल छाजेर यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये हाय बीपी असणाऱ्या व्यक्तींनी नाश्त्यात कोणते पदार्थ टाळावेत आणि त्याऐवजी काय खावं याबद्दल माहिती दिलीये. यामध्ये त्यांनी कोणते पदार्थ टाळावेत याबाबत सांगितलं आहे.

हाय बीपी असल्यास नाश्त्यात काय टाळावे?

जास्त मीठ असलेले पदार्थ

हाय बीपी असणाऱ्या व्यक्तींनी जास्त सोडियम असलेले पदार्थ कमी करणं महत्त्वाचं आहे. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड केलेल्या अनेक पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असते. आहारातून सोडियमचं प्रमाण वाढल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात अशा पदार्थांचं सेवन टाळणं किंवा शक्य तितकं कमी करणं योग्य ठरतं.

चहा आणि कॉफीचं सेवन

अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीशिवाय सुरू होत नाही. परंतु कॅफेनचा काही लोकांच्या ब्लड प्रेशरवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. कॅफेनची संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींमध्ये चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर बीपी वाढू शकतो. त्यामुळे हाय बीपीचा त्रास असणाऱ्यांनी चहा-कॉफीचं प्रमाण आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेणे गरजेचं आहे.

जास्त चरबी असलेले पदार्थ

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हाय बीपी असणाऱ्यांनी दिवसाची सुरुवात बटर, केक, तळलेले पदार्थ, चीज असलेले पदार्थ आणि पेस्ट्री यांसारख्या जास्त चरबीयुक्त पदार्थांनी करू नये. अशा पदार्थांचं सतत सेवन केल्याने आहारातील संतृप्त चरबीचं प्रमाण वाढू शकतं आणि खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

High blood pressure
Garlic for cholesterol: सकाळी लसून खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल कमी होतं? वाचा संशोधन काय सांगतं?

मग हाय बीपीमध्ये सकाळी काय खावं?

नाश्त्यासाठी शक्यतो घरच्या घरी तयार केलेले आणि कमी मीठ-तेल असलेले पदार्थ निवडता येतात. ओटमील, भाज्यांचा उपमा, पोहे किंवा इडली हे नाश्त्यासाठी चांगलं पर्याय ठरू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी लिंबूपाणी किंवा डॉक्टरांनी योग्य मानलेलं साधं पेय घेण्याचा पर्याय निवडता येतो.

जास्त चरबीयुक्त पदार्थांच्या ऐवजी लो-फॅट दूध, दही, होल ग्रेन टोस्ट, उकडलेल्या भाज्या किंवा ताजी फळे आहारात समाविष्ट करता येतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची आरोग्यस्थिती आणि औषधं वेगळी असू शकतात. त्यामुळे हाय बीपीचा त्रास असल्यास आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य आहे.

High blood pressure
Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com