Air Pollution Health Tips: दिवाळीनंतर हवेत विषारी धूर! घरच्या घरी फुफ्फुसे कशी सुरक्षित ठेवणार? 'हे' ५ सोपे उपाय करा

Air Pollution Lung Health Tips: दिवाळीनंतर वाढणाऱ्या वायुप्रदूषणाचा फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो. खोकला, श्वास घेण्यास त्रास टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले पाच महत्त्वाचे उपाय जाणून घ्या आणि आरोग्य जपा.
Air Pollution Health Tips
Air Pollution Health TipsSaam Tv
Published On: 

Air Pollution Lung Health Tips: दिवाळीच्या सणात अनेक शहरांमध्ये वायुप्रदूषणाची पातळी वाढताना दिसते. फटाक्यांच्या धुरामुळे हवेत सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढते. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि विशेषतः फुफ्फुसांवर होतो. प्रदूषित हवेमुळे खोकला, शिंका, घशात जळजळ, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यांना आधीपासून दमा किंवा श्वसनाचे आजार आहेत, त्यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. मात्र, निरोगी व्यक्तींनाही प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रदूषणाचा फुफ्फुसांवर कसा परिणाम होतो?

हवेत धूर आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यास श्वासाद्वारे सूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांमध्ये पोहोचतात. यामुळे श्वसनमार्गाला सूज येऊ शकते. तसेच कफाचे प्रमाण वाढ शकते. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो. दमा असलेल्या व्यक्तींना दम्याचा झटका येऊ शकतो, तर सीओपीडीच्या रुग्णांमध्ये खोकला, कफ आणि धाप लागण्याच्या समस्या वाढू शकतात. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना प्रदूषणाचा अधिक धोका असतो. मुलांची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात, तर वृद्धांमध्ये आधीपासून असलेल्या हृदय आणि फुफ्फुसांच्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.

Air Pollution Health Tips
Weight Loss Tips: व्यायाम करताना जास्त घाम आल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले ५ उपाय

१. दररोज AQI तपासा

घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) तपासा. प्रदूषणाची पातळी जास्त असल्यास विनाकारण बाहेर जाणे टाळा.

२. घरातील हवा स्वच्छ ठेवा

बाहेर प्रदूषण जास्त असल्यास खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. शक्य असल्यास HEPA फिल्टर असलेले एअर प्युरिफायर वापरा.

३. बाहेर जाताना N95 मास्क वापरा

अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना योग्य पद्धतीने चेहऱ्यावर बसणारा N95 किंवा KN95 मास्क वापरा. सामान्य कापडी मास्क सूक्ष्म प्रदूषक कणांपासून पुरेसे संरक्षण देत नाहीत.

४. बाहेर व्यायाम करणे टाळा

AQI जास्त असताना धावणे, जॉगिंग आणि जास्त श्रमाचे व्यायाम करू नका. त्याऐवजी घरामध्ये हलका व्यायाम करा.

५. औषधे आणि इनहेलर वेळेवर घ्या

दमा किंवा श्वसनाचे आजार असल्यास डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या. इनहेलरचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा आणि तो संपण्यापूर्वीच नवीन इनहेलर आणून ठेवा.

Air Pollution Health Tips
Sunil Grover: एका चित्रपटासाठी घेतो लाखोंचं मानधन, तरीही 'हा' अभिनेता रस्त्यावर विकतोय फुलं-कंदील; नेमकं कारण काय?

ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका!

प्रदूषण वाढल्यानंतर सतत खोकला येणे, छातीत जडपणा जाणवणे, श्वास घेताना घरघर होणे, रात्री खोकल्यामुळे झोपमोड होणे किंवा थोडे चालल्यानंतरही धाप लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा औषधे घेऊनही आराम मिळत नसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रदूषणाच्या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.