Weight Loss Tips: व्यायाम करताना जास्त घाम आल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

Weight Loss Tips: व्यायाम करताना जास्त घाम येणे म्हणजे वजन कमी होणे का? घाम आणि शरीरातील चरबीचा नेमका संबंध काय आहे, जाणून घ्या यामागील वैज्ञानिक सत्य आणि महत्त्वाची माहिती.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv
Published On: 

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी अनेकजण रोज व्यायाम, वॉकिंग, रनिंग, झुंबा किंवा दोरीच्या उड्या मारतात. व्यायाम करताना शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडतो. त्यामुळे अनेकांना आपण जितका जास्त घाम गाळू, तितकं जास्त वजन कमी होईल, असं वाटतं. काहीजण तर घाम येत नसेल तर व्यायामाचा पुरेसा फायदा होत नाही, असाही समज करून घेतात. मात्र, खरंच जास्त घाम आल्याने शरीरातील चरबी कमी होते का? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. घाम येण्यामागचं नेमकं कारण जाणून घेऊयात.

घाम येणे म्हणजे वजन कमी होणे नव्हे!

व्यायाम करताना शरीराची हालचाल वाढते. त्यामुळे शरीराचे तापमानही वाढू लागते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे व्यायामानंतर वजनकाट्यावर वजन थोडे कमी दिसू शकते. मात्र, हे वजन कमी होणे म्हणजे शरीरातील चरबी कमी झाली असे नाही. पाणी प्यायल्यानंतर हे वजन पुन्हा वाढू शकते.

Weight Loss Tips
Leftover Rice Benefits: रात्रीचा शिळा भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

वजन कमी करण्यासाठी काय महत्त्वाचे?

वजन कमी करण्यासाठी शरीरातील कॅलरीज बर्न होणे महत्त्वाचे आहे. चालणे, धावणे, सायकलिंग, झुंबा, पोहणे आणि दोरीच्या उड्या यांसारख्या व्यायामांमुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. यासोबतच संतुलित आहार घेणेही तितकेच गरजेचे आहे. आहारातून मिळणाऱ्या कॅलरीजपेक्षा शरीराने बर्न केलेल्या कॅलरीजचे प्रमाण अधिक असेल, तर हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss Tips
Diwali Diya Vastu Tips: दिवाळीच्या रात्री घराच्या दरवाजावर दिवा का लावला जातो? जाणून घ्या खास धार्मिक महत्त्व

कमी घाम आला तरी वजन कमी होऊ शकते!

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना वेगळी असते. त्यामुळे काही लोकांना अगदी थोडा व्यायाम केला तरी भरपूर घाम येतो, तर काहींना तासभर व्यायाम करूनही कमी घाम येतो. याचा अर्थ कमी घाम येणाऱ्या व्यक्तीला व्यायामाचा फायदा होत नाही का? असा नाही. व्यायामाची तीव्रता, वातावरणातील तापमान, आर्द्रता आणि शरीराची नैसर्गिक रचना यांवर घामाचे प्रमाण अवलंबून असते.

जास्त घाम येणे ठरू शकते धोकादायक!

वजन कमी करण्यासाठी मुद्दाम जास्त घाम काढण्याचा प्रयत्न करू नये. उन्हात व्यायाम करणे, जाड कपडे घालणे किंवा सॉना बेल्ट वापरणे टाळावे. अतिप्रमाणात घाम आल्यास शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊ शकतात. त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घामाच्या प्रमाणाकडे लक्ष देण्यापेक्षा नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि शरीराला आवश्यक तेवढे पाणी देणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, घाम किती आला यापेक्षा शरीरातील चरबी किती कमी झाली, हे वजन कमी करण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.