Diwali Diya Vastu Tips: दिवाळीच्या रात्री घराच्या दरवाजावर दिवा का लावला जातो? जाणून घ्या खास धार्मिक महत्त्व

Diwali Diya Vastu Tips: दिवाळीच्या रात्री घराच्या दरवाजावर दिवा लावण्यामागे कोणती धार्मिक मान्यता आहे? देवी लक्ष्मीचे स्वागत, सकारात्मकता आणि वास्तुशास्त्राशी संबंधित महत्त्व जाणून घ्या.
Diwali Diya Vastu Tips
Diwali Diya Vastu TipsSaam Tv
Published On: 

Diwali Diya Vastu Tips: दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी प्रत्येक घरात दिवे लावून रोषणाई केली जाते. घराच्या अंगणापासून ते बाल्कनी, खिडक्या आणि छतापर्यंत सर्वत्र दिव्यांची सजावट पाहायला मिळते. मात्र, दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर आवर्जून दिवा लावण्याची परंपरा आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की मुख्य दरवाजावरच दिवा का लावला जातो? यामागे केवळ सजावटीचा उद्देश नसून धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्राशी संबंधित काही मान्यता आहेत.

हिंदू धर्मात दिवाळी हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा सण मानला जातो. अशी धार्मिक मान्यता आहे की दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवून तिथे दिवा लावला जातो. मुख्य दरवाजावर लावलेला दिवा हा देवी लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानला जातो. प्रकाशाने उजळलेला दरवाजा घरात सकारात्मकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण करतो, अशी श्रद्धा आहे. दिवा हा अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दिवाळीच्या दिवशी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावण्यामागेही हीच भावना असते. मुख्य दरवाजावर दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता, अंधार आणि निराशा दूर होऊन सुख, शांती आणि आनंदाचे आगमन होते, अशी धार्मिक धारणा आहे.

Diwali Diya Vastu Tips
Leftover Rice Benefits: रात्रीचा शिळा भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

वास्तुशास्त्रानुसारही घराचा मुख्य दरवाजा महत्त्वाचा मानला जातो. कारण मुख्य दरवाजा हा घरात ऊर्जा आणि समृद्धी प्रवेश करण्याचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे दिवाळीच्या रात्री दरवाजावर दिवा लावल्याने घरातील वातावरण शुभ राहते, अशी मान्यता आहे. काही कुटुंबांमध्ये मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवे लावले जातात.

Diwali Diya Vastu Tips
Diwali Parenting Tips: दिवाळीत घरी पाहुणे येणार आहेत? मग, मुलांना आधीच शिकवा या ५ गोष्टी; ऐनवेळी होणार नाही फजिती!

मात्र, दिवा लावताना सुरक्षिततेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुख्य दरवाजावर दिवा ठेवताना तो कोणाच्या पायाला लागणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तसेच दरवाजाचे पडदे, चपला किंवा इतर ज्वलनशील वस्तूंपासून दिवा दूर ठेवावा. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना दिव्यापासून दूर ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.