Diwali Parenting Tips: दिवाळीत घरी पाहुणे येणार आहेत? मग, मुलांना आधीच शिकवा या ५ गोष्टी; ऐनवेळी होणार नाही फजिती!

Diwali Parenting Tips: दिवाळीत घरी पाहुणे येणार असतील तर मुलांना आधीच ५ महत्त्वाचे गोष्टी शिकवा. पाहुण्यांचे स्वागत, जेवणाच्या सवयी आणि इतर मुलांसोबत खेळताना कसे वागावे हे मुलांना प्रेमाने समजवा.
Diwali Parenting Tips
Diwali Parenting TipsSaam Tv
Published On: 

Diwali Parenting Tips: दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या काळात घरात नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुण्यांची सतत ये-जा सुरू असते. पाहुणे घरी येणार म्हटले की लहान मुलांमध्येही प्रचंड उत्साह असतो. पाहुण्यांसोबत खेळणे, गप्पा मारणे आणि त्यांच्याकडून भेटवस्तू मिळवणे याची मुलांना विशेष उत्सुकता असते. मात्र, कधी कधी याच उत्साहात मुलांकडून काही चुका होतात. त्यामुळे पालकांना पाहुण्यांसमोर लाजिरवाणं झाल्यासारखं वाटतं.

काही मुले पाहुण्यांचे बोलणे मध्येच तोडतात, तर काही जण कोणतीही वस्तू न विचारता हातात घेतात. त्यामुळे दिवाळीच्या आधीच मुलांना चांगल्या सवयी आणि शिष्टाचार शिकवणे आवश्यक आहे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांच्यात चांगले संस्कारही रुजतात.

Diwali Parenting Tips
Leftover Rice Benefits: रात्रीचा शिळा भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

सर्वप्रथम, घरी कोणी पाहुणे आले की मुलांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत करावे, असे त्यांना समजावून सांगा. मोठ्यांना नमस्कार करणे ही चांगली सवय आहे. मात्र, एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर मूल लाजत असेल, तर त्याला जबरदस्ती करू नका. पालकांनी स्वतः पाहुण्यांचे स्वागत करून मुलांसमोर चांगला आदर्श ठेवावा. दिवाळीत पाहुणे अनेकदा भेटवस्तू, बॅग, मोबाईल किंवा इतर वस्तू घेऊन येतात. मुलांना नवीन वस्तू पाहण्याची उत्सुकता असते. अशावेळी त्यांनी कोणाच्याही वस्तूंना परवानगीशिवाय हात लावू नये, हे शिकवणे महत्त्वाचे आहे. एखादी वस्तू पाहायची असल्यास आधी परवानगी घ्यावी, असे त्यांना सांगा.

Diwali Parenting Tips
Toran Design: घराच्या मुख्य दरवाजावर कोणते तोरण लावल्याने लक्ष्मीची कृपा वर्षभर राहील? जाणून घ्या वास्तुचे नियम

लहान मुले अनेकदा नकळत काही गोष्टी बोलून जातात. एखाद्याच्या रंगावर, वजनावर, कपड्यांवर किंवा बोलण्याच्या पद्धतीवर टिप्पणी करणे चुकीचे आहे. त्यामुळे मुलांना कोणाचीही चेष्टा किंवा थट्टा करू नये, हे समजावून सांगा. आपण काही चुकिचं बोलल्याने समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला शिकवा. दिवाळीत घरात अनेक प्रकारचे गोड पदार्थ, मिठाई आणि फराळाचे पदार्थ बनवले जातात. अशावेळी मुलांना आवडणारे पदार्थ दिसताच ते खाण्याची घाई होते. मात्र, पदार्थ घेण्यापूर्वी विचारावे आणि ताटात गरजेपुरतेच अन्न घ्यावे, हे शिकवा. जेवताना तोंडात अन्न असताना बोलू नये आणि जेवण झाल्यानंतर आपले ताट योग्य ठिकाणी ठेवावे, अशा चांगल्या सवयी मुलांना लावा.

याशिवाय, दिवाळीत अनेक नातेवाईक आपल्या मुलांनाही सोबत घेऊन येतात. अशावेळी खेळण्यांवरून किंवा खेळताना मुलांमध्ये भांडणे होऊ शकतात. त्यामुळे आपल्या मुलांना इतर मुलांसोबत खेळणी शेअर करणे, एकत्र खेळणे आणि भांडण झाल्यास शांतपणे प्रश्न सोडवणे शिकवा. काही अडचण असल्यास पालकांना सांगण्यासही पालकांनी शिकवले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.