Toran Design: घराच्या मुख्य दरवाजावर कोणते तोरण लावल्याने लक्ष्मीची कृपा वर्षभर राहील? जाणून घ्या वास्तुचे नियम

Toran Design: दिवाळीत घराच्या मुख्य दरवाजाला कोणते तोरण लावावे? आंब्याची पाने, अशोकाची पाने आणि कवडीच्या तोरणांचे महत्त्व जाणून घ्या. घराला द्या पारंपरिक आणि सुंदर लूक, वास्तुशास्त्रानुसार सजवा प्रवेशद्वार.
Toran Design
Toran DesignSaam Tv
Published On: 

Toran Design: दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपले घर सुंदर सजवण्याचा प्रयत्न करतो. घराची साफसफाई, आकर्षक रोषणाई, रांगोळी आणि फुलांच्या सजावटीसोबतच दरवाजाला तोरण लावले जाते. हिंदू धर्मात तोरणाला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशमार्ग मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी सुंदर आणि शुभ तोरण लावले जाते. आंब्याची पाने, अशोकाची पाने, कवडी आणि शिंपल्यांपासून तयार केलेली तोरणे घराच्या सौंदर्यात भर घालतात. यंदाच्या दिवाळीत तुम्हीही मुख्य दरवाजासाठी या ४ प्रकारच्या तोरणांची निवड करू शकता.

आंब्याच्या पानांचे पारंपरिक तोरण

हिंदू धर्मात आंब्याची पाने शुभ मानली जातात. पूजा, विवाह सोहळे आणि सण-उत्सवांमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते, अशी धार्मिक मान्यता आहे. दिवाळीत तुम्ही ताजी आंब्याची पाने वापरून सुंदर तोरण तयार करू शकता. हे तोरण दिसायला साधे असले तरी घराच्या प्रवेशद्वाराला पारंपरिक आणि सुंदर लूक देते.

Toran Design
Leftover Rice Benefits: रात्रीचा शिळा भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

अशोकाच्या पानांचे तोरण

आंब्याच्या पानांप्रमाणेच अशोकाच्या पानांनाही धार्मिक महत्त्व आहे. अशोकाची पाने सुख समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक आहे. सण-उत्सव किंवा इतर शुभ प्रसंगी मुख्य दरवाजाला अशोकाच्या पानांचे तोरण लावू शकता. तोरण तयार करताना ताजी पाने निवडा. तसेच ती दरवाजाला व्यवस्थित बांधा. हिरव्यागार पानांमुळे घराच्या प्रवेशद्वाराला नैसर्गिक आणि आकर्षक लूक मिळतो.

Toran Design
Kamali Serial: 'कमळी' मालिकेतील दिवाळीत मोठा ट्विस्ट! कमळीचा होणार नवा मेकओव्हर, पण लग्नमंडपातून जाणार पळून

कवडी आणि शिंपल्यांचे तोरण

तुम्हाला दरवर्षी वापरता येईल असे तोरण हवे असेल तर कवडी आणि शिंपल्यांपासून तयार केलेले तोरण हा उत्तम पर्याय आहे. कवडीचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे ती धन आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. बाजारात वेगवेगळ्या डिझाइनमध्ये कवडी, शिंपले आणि मण्यांपासून तयार केलेली सुंदर तोरणे मिळतात. ही तोरणे घराच्या मुख्य दरवाजाला पारंपरिक आणि आकर्षक लूक देतात.

खराब आणि जुने तोरण लावू नका

वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजावर लावलेले तोरण नेहमी स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असावे. अनेकदा आंबा किंवा अशोकाच्या पानांचे तोरण काही दिवसांनी सुकते किंवा खराब होते. अशा वेळी ते लगेच बदलावे. तसेच तोरणावर धूळ साचली असेल किंवा ते तुटलेले असेल तर ते साफ करावे किंवा नवीन तोरण लावावे. स्वच्छ आणि सुंदर तोरणामुळे घराच्या प्रवेशद्वाराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.