Sunil Grover: एका चित्रपटासाठी घेतो लाखोंचं मानधन, तरीही 'हा' अभिनेता रस्त्यावर विकतोय फुलं-कंदील; नेमकं कारण काय?

Sunil Grover: अभिनेता सुनील ग्रोव्हरचा दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून फुले विकतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्याचा साधेपणा आणि हटके अंदाज पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Sunil Grover
Sunil GroverSaam Tv
Published On: 

Sunil Grover: मनोरंजन विश्वात नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेक कलाकारांचे राहणीमान बदलते. मात्र, काही कलाकार असे असतात जे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपला साधेपणा आणि माणुसकी जपतात. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'द ग्रेट इंडियन कपिल शो' फेम सुनील ग्रोव्हर आहे. दिवाळीच्या निमित्ताने सुनीलने रस्त्याच्या कडेला बसून फुले आणि कंदील विकतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

रस्त्याच्या कडेला बसून विकली फुले

सुनील ग्रोव्हरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो रस्त्याच्या कडेला जमिनीवर बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर फुलांचा मोठा ढीग असून, हातात दिवाळीसाठी लागणारी फुले आणि सजावटीच्या वस्तू दिसत आहेत. विशेष म्हणजे, तो रस्त्यावर फुले विकणाऱ्या काही मुलींसोबतही बसलेला पाहायला मिळत आहे. यावेळी सुनीलने शॉर्ट्स आणि साधा टी-शर्ट परिधान केला आहे. त्याच्या या साध्या अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटो शेअर करताना त्याने, 'सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात प्रेम आणि प्रकाशाचे आगमन होवो,' असे कॅप्शन दिले आहे.

Sunil Grover
Papia Adhikari: फटाके फोडल्याने आजार बरे होतात; भाजप आमदाराचं अजब विधान

खरंच फुले विकतोय का सुनील ग्रोव्हर?

सुनील ग्रोव्हरने खरोखरच फुले विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही. दिवाळीनिमित्त रस्त्याच्या कडेला फुले विकणाऱ्या विक्रेत्यांसोबत बसून त्याने हा फोटो काढला आहे. सुनील आपल्या विनोदी स्वभावासोबतच साधेपणासाठीही ओळखला जातो. तो अनेकदा अशाच हटके अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

Sunil Grover
Weight Loss Tips: व्यायाम करताना जास्त घाम आल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

कधी म्हशींना अंघोळ, तर कधी रस्त्यावर इस्त्री!

याआधीही सुनीलने असे अनेक मजेशीर व्हिडिओ शेअर केले आहेत. जून महिन्यात त्याने नदीकाठी सामान्य लोकांसारखं चादरीवर झोपतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर एका व्हिडिओमध्ये तो म्हशींना अंघोळ घालताना दिसला होता. एवढेच नाही तर रस्त्याच्या कडेला बसून स्वतःच्या पँटला इस्त्री करतानाचा आणि कांदे विकतानाचाही त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.