Papia Adhikari: फटाके फोडल्याने आजार बरे होतात; भाजप आमदाराचं अजब विधान

Papia Adhikari: पश्चिम बंगालच्या भाजप आमदार पापिया अधिकारी यांनी फटाके फोडल्याने आजार बरे होतात, असा अजब दावा केला आहे. त्यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आले आहे.
 Papia Adhikari
Papia AdhikariSaam Tv
Published On: 

Papia Adhikari: दिवाळी आणि काली पूजेच्या उत्सवादरम्यान फटाके फोडण्यावरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. अशातच भाजपच्या एका महिला आमदाराने केलेल्या अजब विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होतात, असा दावा भाजप आमदार पापिया अधिकारी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका होत आहे.

फटाके फोडल्याने आजार बरे होतात, भाजप आमदाराचा दावा

पश्चिम बंगालमधील टोलीगंज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार पापिया अधिकारी एका काली पूजा कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी फटाके फोडण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होतात, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

 Papia Adhikari
Latur Crime News: लातूरमध्ये माणुसकीला काळिमा! प्रॉपर्टीसाठी बापानेच ७ वर्षांच्या मुलाची केली हत्या

भाषण सुरू करताच समोर फुटला फटाका

काली पूजेचे विधी पूर्ण झाल्यानंतर पापिया अधिकारी माइकवरून बोलण्यास सुरुवात करत होत्या. त्याचवेळी त्यांच्या समोरच मोठा आवाज करत एक फटाका फुटला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, फटाके फोडल्याने आजार बरे होतात. यावेळी त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या विधानाचाही संदर्भ दिला. मात्र, बोलताना त्यांनी सुवेंदू अधिकारी यांचा उल्लेख चुकून मुख्यमंत्री असा केल्याचे सांगितले जात आहे. पण, सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.

 Papia Adhikari
Weight Loss Tips: व्यायाम करताना जास्त घाम आल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

फटाक्यांशिवाय काली पूजा कशी पूर्ण होणार?

यावेळी पापिया अधिकारी यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला की, फटाक्यांशिवाय काली पूजा कशी पूर्ण होऊ शकते? लोक फटाके नक्कीच फोडतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र, फटाके फोडताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यावर त्यांनी भर दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.